माळशिरस तालुक्याला भाऊंसारखे गरीब कुटुंबातील व गरिबीची जाणीव असणारे आमदार लाभले – ज्ञानेश राऊत
सदाशिवनगर ( बारामती झटका )
“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले”, या उक्तीप्रमाणे आमच्या माळशिरस तालुक्यासाठी लाभलेले सर्वसामान्यांचे व गोरगरीबांचे आमदार रामभाऊ सातपुते यांचे सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर राऊत यांनी मनापासून आभार मानले आहेत.
ज्ञानेश राऊत यांनी सांगितले कि, गेली दोन वर्ष माझे वडील पांडुरंग बाबा राऊत गुडघ्याच्या त्रासामुळे खूपच त्रस्त होते. खूप औषधे गोळ्या झाल्या, परंतु काही केल्या फरक पडत नव्हता. नंतर आमचे पाहुणे श्री. सतीश बरडकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी लगेच स्वीय सहाय्यक हरिभाऊ पालवे यांना फोन लावण्यास सांगून त्यांनी स्वतः वडिलांच्या आजराबद्दल विचारपूस केली. त्यांचे गुडघ्याचे ऑपरेशन तुम्हाला पुण्यात (दिनानाथ) ला करायचे कि मुंबई (रिलायन्स) मध्ये करायचे असे त्यांनी विचारले. पण मी सांगितले भाऊ एवढी मोठी रक्कम माझ्याकडे नाही. जेणेकरून मी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू शकेन ? या प्रश्नावर भाऊ म्हणले की त्याची तुम्ही काळजी करू नका, ते मी पाहतो. तुम्ही फक्त सांगा कुठे करायचे. मी पण त्यांना मुंबईला करू असे सांगितले. त्यांनी लगेच यंत्रणा लावून मुंबईमधील पी.ए. समाधान पाटील यांना फोन करून माहिती दिली व त्यांनी मला वडिलांना घेवून रिलायन्स हॉस्पिटलला डॉ. वैभव भगारिया यांना भेटायला सांगितले. त्या पद्धतीने आम्ही त्यांचेकडे जाऊन तपासणी केली. त्यांनी सर्व तपासणी करून गुडघा खराब झाल्यामुळे तो शस्त्रक्रिया करून बदलावा लागेल व त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. हे मी आमदार साहेबांना सांगितले. त्यांनी सांगितले काही काळजी करू नका.

शासकीय आमदार निवास आकाशवाणी या ठिकाणी त्यांचे पी.ए. पाटील साहेब यांनी आमदार साहेबांच्या रूममध्ये आमची राहण्याची, जेवणाची व झोपण्याची सोय केली. जीवनात पहिल्यांदा माझे वडील मुंबईला आले व आमदार निवासला राहिले होते. दुसऱ्या दिवशी सर्व फॉर्म व लेटर घेऊन आम्ही परत हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे ते सबमिट केले व त्यांनी सांगितले आम्ही फोन केल्यानंतर ऑपरेशनला घेऊन या. बरोबर २ महिन्यानंतर त्यांचा फोन आला की, ऑपरेशनसाठी तुम्ही १४/०३/२०२२ हजर रहावा मी व वडील रिलायन्स हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी दाखल झालो १५ तारखेला सकाळी ८ ते ११ ऑपरेशन यशस्वी झाले. एवढे मोठे हॉस्पिटल व त्या मध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा बघून मी खूपच भारावून गेलो. ऑपरेशन झाल्याचे आमदार साहेबांना फोन करून सांगितले. त्यांनीही खूप काळजीने वडिलांची विचार पूस केली व काही अडचण असेल तर कधी ही फोन करा मी मुबंईमध्ये आहे. वेळ मिळाला तर भेटून ही जातो असेही ते म्हणाले. आणि मला खरंच विश्वास बसला नाही एका तासानंतर मला भाऊंचा फोन आला की मी भेटण्यासाठी येत आहे. एवढ्या बीझी कामाच्या शेड्युलमधून भाऊ मला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले व वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करून आणखीन काही लागले तर मला कळवा असे सांगून निघून गेले.
खरंच खूप मोठे भाग्य आहे आमचे आमच्या माळशिरस तालुक्याला भाऊसारखा गरीब कुटुंबातील व गरिबीची जाणीव असणार आमदार लाभला. पुन्हा एकदा मनापासून भाऊ तुमचे आभार कारण आपल्या प्रयत्नामुळे मी माझ्या वडिलांचे ऑपरेशन एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करू शकलो, ते ही अगदी मोफत. तसेच मुबंई मधील प्रसिद्ध सर्जन डॉ. वैभव भागरिया व त्यांची टीम यांचेही शतशः आभार ज्ञानेश्वर राऊत यांनी म्हणून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करून कृतज्ञता केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng