भांबचे स्वयंभू जागृत शिवलिंगाचे संभाजीबाबा मंदिरात खडतर रस्त्याचा प्रवास करून भाविकांनी दर्शन घेतले.

वैष्णवी प्रफुल्ल काळे हिच्या वाढदिवसाच्या साबुदाणा खिचडी व केळी याचा भाविक भक्तांना दिलासा

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाच्या सातारा सरहद्दीवर भांब गावच्या डोंगर कपारीमध्ये स्वयंभू जागृत शिवलिंगाचे संभाजी बाबा मंदिरात खडतर रस्त्याचा प्रवास करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भांबचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल काळे उर्फ पप्पू यांची सात वर्षाची कन्या वैष्णवी काळे हिचा आज योगायोगाने वाढदिवस आलेला आहे. वायफट खर्च न करता संभाजी बाबा मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शाबुदाणा खिचडी व केळीचे वाटप केल्याने भाविक भक्तांना दिलासा मिळालेला आहे.

वैष्णवी प्रफुल्ल काळे यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी बाबा मंदिरामध्ये साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप भांब गावचे माजी सरपंच धनाजी काळे, नातेपुते गावचे सुप्रसिद्ध डॉ. नरेंद्र कवितके, भीमराव रुपनवर, एसके ग्रुप सरगरवाडी, भाब ग्रामपंचायत सदस्य बाळू रामा काळे, महादेव मारुती काळे, बबन मारुती काळे (ड्रायव्हर), संभाजी बाबा मंदिराचे पुजारी रामा काळे, कन्हेर ग्रामपंचायत सदस्य दत्ता गुरुजी, गणेश काळे, गणेश माने आदी मान्यवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भांब गावच्या संभाजी बाबा जागृत देवस्थानाला ऐतिहासिक वारसा आहेत. शिवलिंगाची अख्यायिका अनेक जुने लोक सांगत असतात. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये लोकांचे श्रद्धास्थान असणारे संभाजी बाबा मंदिर आहे. भांब गावापासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर डोंगर-दऱ्या खोऱ्याच्या कपारीला मंदिराचे स्वयंभू स्थान आहे. शिंगणापूरच्या डोंगर रांगा असा पहाडी प्रदेश आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे. सदर ठिकाणी जाण्यास रस्त्याची मोठी अडचण आहे. तरीसुद्धा भाविक संभाजी बाबा मंदिराच्या भक्ती व श्रद्धेमध्ये कमीपणा करीत नाहीत. खडतर रस्त्याचा प्रवास करून मिळेल त्या वाहनाने किंवा पायी जाऊन लोक भक्तिभावाने दर्शन घेत होते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा जागृत देवस्थान असल्याने अनेक भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त साबुदाणा खिचडी व केळी वाटप केलेली असल्याने भाविकांना दोन घास खाऊन दोन घोट पाणी पिण्यास मिळालेले असल्याने वैष्णवीच्या वाढदिवसाला अनेकांनी समाधानाने शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेक भाविकांची इच्छा आहे, संभाजी बाबा मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त व्हावा. येणा जाणाऱ्या भाविकांची अडचण दूर व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे भाविकांमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय शैक्षणिक संकुलात जागतिक विज्ञान दिन साजरा…
Next articleहनुमान मंदिराच्या परिसरातील वनीकरणाचा कारभार रामभरोसे, दत्तात्रय यांनी लक्ष देण्याची गरज, पाणी उशाला कोरड घशाला अशी अवस्था…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here