भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील बेकायदेशीर आरागिरणीवर पुणे वनविभागाची कारवाई

पुणे (बारामती झटका) 

भांबुर्डा वनपरिक्षेत्र परिसरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या आरागिरणीवर छापा टाकून  एक आरा मशीन, 2 कटर यंत्रे जप्त करण्यासह आरा गिरणीसाठी लाकडाचा अवैध साठा आढळून आलेले गोडाऊन सीलबंद करण्याची कारवाई आज पुणे वनविभागाने केली आहे.

            वनविभागाला रावेत (पिंपरी चिंचवड) येथे बेकायदेशीर आरागिरणी (सॉ मिल) सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या आरागिरणीमध्ये प्रितम गौतमचंद कांकरिया यांच्या मालकीच्या रावेत येथील समर्थ पॅकेजिंग या आरागिरणीचा समावेश होता.

            पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, भांबुर्डा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, वनपाल वैभव बाबर, महेश मेरगेवाड, वनरक्षक सुरेश बरले, बाळासाहेब जिवडे, ज्ञानेश्वर ठाकरे आणि भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील इतर वनकर्मचाऱ्यांनी या छाप्यामध्ये सहभाग घेतला. या प्रकरणात भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंदवून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी अर्ज करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ
Next articleपुणे विभागातील 19 लाख 52 हजार 71 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here