डॉ. दिलीप वाघमोडे यांना पितृशोक.
माळशिरस ( बारामती झटका )
भांबुर्डी ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार समाजसेवक तुळशीराम सुखदेव वाघमोडे यांचे रविवार दि. 01/05/2022 रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कमलताई, दोन मुले चांगदेव व डॉक्टर दिलीप, दोन मुली सुरेखा तानाजी काळे व मंगल तानाजी शिंदे यांच्यासह सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर भांबुर्डी येथील दुर्गा देवी मंदिर येथे राहत्या निवासस्थानाशेजारी शेतामध्ये अग्नीसंस्कार केलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम मंगळवार दि. 03/05/2022 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.
स्वर्गीय तुळशीराम वाघमोडे यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. समाजामध्ये आदर्श वागणूक असल्याने त्यांच्या शब्दाला किंमत होती. समाजामध्ये वेगळे स्थान होते. त्यांनी आपला मुलगा दिलीप यांना डॉक्टर केले. त्यांनी आपल्या मुलांवर व नातवांवर चांगले संस्कार केले. नातवंडांनीसुद्धा शिक्षणामध्ये प्रगती केलेली आहे. चांगदेव यांचा मुलगा बीएससी ऍग्री झालेला आहे. दुसरा ग्रॅज्युएट आहे. डॉ. दिलीप यांची कन्या डॉक्टर झालेली आहे. तर मुलगा इंजिनियर आहे. मुलगी सुरेखा तानाजी काळे यांची मुले डॉक्टर आहेत. मुलगी मंगल तानाजी शिंदे यांची दोन्ही मुले व एक मुलगी इंजिनिअर आहेत. असे सुसंस्कृत व सुशिक्षित वाघमोडे परिवार आहे. स्वर्गीय तुळशीराम वाघमोडे यांचा सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होता. त्यांच्या दुःखद निधनाने भांबुर्डी पंचक्रोशी व वाघमोडे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाघमोडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng