भांबुर्डी गावच्या बिनविरोध सरपंचपदी लक्ष्मी महादेव वाघमोडे यांची निवड.

ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे गटाला गावगाड्यात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाची संधी मिळाली.


भांबुर्डी ( बारामती झटका )

भांबुर्डी तालुका माळशिरस ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंचपदी लक्ष्‍मी महादेव वाघमोडे यांची निवड करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नेते गणपत तात्या वाघमोडे गटाला गावगाड्यात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाची संधी मिळालेली आहे.
थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच सौ स्वाती ताई दादासाहेब वाघमोडे यांनी गावगाड्यात ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. शासनाच्या जनतेतील सरपंच पदाच्या निवडी रद्द झाल्याने सरपंच पदाच्या दावेदार असणाऱ्या रुक्मिणी वाघमोडे यांना ग्रामपंचायत सदस्य होऊन सरपंच पदावर विराजमान होणार होत्या मात्र अंतर्गत कलहामुळे रुक्मिणी वाघमोडे यांचा निसटत्या मताने पराभव झाला. तरीसुद्धा गावगाड्यात ठरल्याप्रमाणे गणपत तात्या वाघमोडे गटाला सरपंच पदाची संधी दिलेली होती त्यांच्या गटातून क्ष्‍मी महादेव वाघमोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आज ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची निवडणूक होऊन एकमेव अर्ज आलेला असल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली यावेळी गणपत तात्या वाघमोडे शिवाजीराव शिंदे, संजयअण्णा मोटे, केशव वाघमोडे देविदास वाघमोडे, शंकर वाघमोडे, बळवंत वाघमोडे, ज्ञानदेव वाघमोडे, अशोक वाघमोडे, महादेव वाघमोडे, रवीतात्या मोटे, दादासाहेब वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, संजय बंडगर, आप्पा वाघमोडे, संतोष वाघमोडे, दिनेश जावीर, हनुमंत बंडगर, बबन वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, बाबा देवकते, सतीश तिकुटे, चंद्रकांत वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, सरक मामा, पप्पूभाई मुलांनी, प्रदीप वाघमोडे, तात्या वाघमोडे, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. बिनविरोध सरपंच पदाची घोषणा होताच मावळते सरपंच सौ स्वाती ताई वाघमोडे यांनी नूतन सरपंच लक्ष्मी वाघमोडे यांचा सन्मान केला.
माळशिरस चे तहसीलदार जगदीश निंबाळकर नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप चव्हाण यांनी काम पाहिले त्यांना तलाठी अमोल चव्हाण व ग्रामसेविका सारिका भापकर मॅडम यांनी सहकार्य केले. माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार भोसले साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंढरपुरात मोहोळ न्यूज व तेज न्यूज चॅनल च्या कार्यालयाचे उद्घाटन.
Next articleमहाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या यांच्यामध्ये काका सरस मात्र मेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पुतण्या सरस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here