भांबुर्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतील कोमल वाघमोडे यांच्या विजयाने राजकीय समीकरणे बदलली.

रुक्मिणी वाघमोडे सरपंच पदाच्या दावेदार यांचा पराभव झाल्याने राजकारणाला वेगळी दिशा मिळणार.


भांबुर्डी ( बारामती झटका )

भांबुर्डी तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 5 मधील सदस्य विष्णू वाघमोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सौ कोमल संतोष वाघमोडे व सौ रुक्मिणी मारुती वाघमोडे यांच्या अटीतटीच्या लढतींमध्ये कोमल वाघमोडे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या असल्याने भांबुर्डी गावचे राजकीय समीकरण बदलणार आहे. रुक्मिणी वाघमोडे सरपंच पदाच्या दावेदार समजल्या जात असल्याने त्यांच्या गटाला पराभव झालेला असल्याने त्यांच्या गटाला धक्का बसलेला असून राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे.
भांबुर्डी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कोमल संतोष वाघमोडे यांना 278 मते तर रुक्मिणी मारुती वाघमोडे यांना 272 मते कोमल वाघमोडे यांचा सहा मतांनी विजय झालेला आहे विशेष म्हणजे त्यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत सात मतदारांनी नोटा पसंत केलेला आहे त्यामुळे सात लोकांनी जर रुक्मिणी वाघमोडे यांना पसंती दिली असती तर राजकीय समीकरणे बदलली नसती.


भांबुर्डी गावचे ग्रामपंचायत निवडणूक थेट जनतेतून सरपंच पदासाठी 2018 साली झालेली होती. गावातील दोन्ही गट एकत्र येऊन थेट जनतेतील सरपंच पदासाठी सौ स्वातीताई दादासाहेब वाघमोडे यांना उमेदवारी दिलेली होती त्यांना गावाने बहुमताने निवडून दिलेले होते गावांमधील दोन गटांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांची विभागणी झालेली होती सात जागेवर दादासाहेब वाघमोडे गटाचे यांचे सदस्य तर सहा जागेवर गणपतराव वाघमोडे गटाचे यांचे सदस्य होते. पहिली अडीच वर्ष दादासाहेब वाघमोडे गटाला सरपंच पदाची दिलेली होती उर्वरित अडीच वर्ष गणपततात्या वाघमोडे गटाच्या सरपंच करावयाचे ठरलेले होते मात्र महा विकास आघाडी सरकारचा थेट जनतेतील सरपंच पदाचा निर्णय बदलला त्यामुळे सरपंच होण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य होणे गरजेचे होते यासाठी गणपत तात्या वाघमोडे यांच्या गटातील प्रभाग क्रमांक पाच मधील विष्णू वाघमोडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर जागेवर रुक्मिणी वाघमोडे यांना संधी देऊन सरपंच करण्यासाठी सदस्य करण्याचे नियोजन केले. मात्र या पूर्वी विष्णू वाघमोडे यांच्या जागी मधुकर वाघमोडे यांना उमेदवारी देण्याचे ठरले होते. मात्र मधुकर वाघमोडे मयत झालेले असल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह प्रभागातील लोकांचा होता. मधुकर वाघमोडे घरातील उमेदवारांना लावलेले असल्याने व उमेदवार वार्डाच्या बाहेरील आसल्याच्या मुद्दयावरुण राजकारण रंगले व या गटाच्या सरपंच पदाच्या दावेदार असणाऱ्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. सरपंच पदाचा सौ स्वाती ताई दादासाहेब वाघमोडे यांनी राजीनामा दिलेला आहे सदर जागेची निवडणूक उद्या 23 डिसेंबर 20 21 रोजी होणार आहे त्यामुळे गणपत तात्या वाघमोडे यांच्या पाच सदस्यांपैकी सरपंच होणार की दादासाहेब वाघमोडे यांच्या गटातील सरपंच होणार कारण सरपंच करण्याकरता रुक्मिणी वाघमोडे यांना शब्द दिलेला होता त्यांचा पराभव झालेला असल्याने दोन्ही गटासमोर पेचप्रसंग उभा राहिलेला आहे निवडणुकीच्या सुरुवातीस आणाभाका झालेल्या होत्या त्यामुळे सरपंच कोणाचा होतो याकडे भांबुर्डी करा सहा माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील ग्रामपंचायत सदस्यांचे धक्कादायक निकाल.
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा- जिल्हाकार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here