भांबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी ता. माळशिरस येथे श्री काळभैरवनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज शनिवार दि. २३/४/२०२२ मंगळवार दि. २६/४/२०२२ या चार दिवशी ही यात्रा होणार आहे. कोरोना महामारीमुळे २ वर्षांपासून यात्रा उत्सव बंद करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी काळभैरवनाथ देवाच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार आहेत.
चैत्र वद्य ७ शके १९४४ शनिवार दि. २३/४/२०२२ रोजी सकाळी ७ वाजता काळभैरवनाथाची महापूजा करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता देवाचा लग्न सोहळा होणार असून यावेळी संपूर्ण कुसुंबा महाप्रसाद एडवोकेट नाथा मारुती वाघमोडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फास्ट सायकल, रनिंग मोठा गट, लहान गट, मध्यम गट मुले आणि मुली यांच्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. २४/४/२०२२ रोजी दु. १२ वा. गजी ढोल मंडळ भांबुर्डी व नागोबा गजी ढोल मंडळ विरकरवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे. त्याच बरोबर दिवसभर तीन पायांची शर्यत, संगीत खुर्ची मुले-मुली, लिंबू चमचा मुली, घागरी स्पर्धा मुली, डोळे बांधून मडके फोडणे, स्लो सायकल स्पर्धा, स्लो मोटर सायकल स्पर्धा, गाढवाला शेपूट लावणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ८.३० वा. बहारदार असा रंगबहार ऑर्केस्ट्रा, टेंभुर्णी कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. २५/४/२०२२ रोजी दु. १ वा बैलगाडा शर्यती भरवण्यात येणार आहेत. मंगळवार दि. २६/४/२०२२ रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन सकाळी ९ वा. करण्यात आले आहे.

तरी भाविकांनी श्री काळभैरव यात्रेस मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भांबुर्डी नगरीमध्ये सर्व भाविकांचे मित्र परिवार नातेवाईक यांचे हार्दिक स्वागत – शुभेच्छुक विष्णू भाऊ वाघमोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, भांबुर्डी
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng