भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा, अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले.

आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे सोलापूर, ॲड. आकाश गायकवाड मुंबई, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. निशांत लोंढे माळशिरस यांनी काम पाहिले.

सोलापूर ( बारामती झटका )

एका महिलेवर केलेल्या कथित दुष्कर्म प्रकरणी आपणास अटक होईल, या भीतीने माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांच्यासमोर झाली. श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने पारित केले असल्याने तूर्तास दिलासा मिळालेला आहे.

हकीकत अशी की, मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्नाचे अमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली इत्यादी ठिकाणी त्यांच्यावर दुष्कर्म केले, मात्र लग्न केले नाही. अशा आशयाची फिर्याद प्रथमत: पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग केली. त्यानंतर पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करण्यासाठी त्यांच्या मागावर होते. त्यामुळे आपणास त्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा अर्ज ॲड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत दाखल केला.

सुनावणीचे वेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सक्रत दर्शनी दुष्कर्माचा गुन्हा आकर्षित होत नाही. अर्जदार हा कोठेही पळून जाणार नाही व तो न्यायालयाचे आदेशाचे पालन करेल, असा युक्तिवाद केला. त्यावरून न्यायाधिशांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश पारित केला. मात्र पोलीस ठाण्यात दि. 26/7/2022 व दि. 27/7/2022 रोजी हजेरी देण्याचा आदेश केला व पुढील सुनावणीसाठी दि. 28/7/2022 ही तारीख नेमली.

न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे सोलापूर, ॲड. आकाश गायकवाड मुंबई, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. निशांत लोंढे माळशिरस यांनी काम पाहिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांची विठ्ठलराव गोफणे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
Next articleसहकार महर्षीपासून पिसेवाडी, वेळापूर परिसरातील निष्ठावान राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आदर्श घराणे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here