भाजपचे मोहिते पाटील गटाचे सयाजीराजे विकास सेवा संस्थेला फक्त नावंच राहिले, एकहाती सत्ता गेली राष्ट्रवादीच्या ताब्यात.

महात्मा फुले कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय, सत्ताधारी गटाचा सुपडा साफ.

फोंडशिरस (बारामती झटका)

सयाजीराजे विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. फोंडशिरस (ता. माळशिरस) या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महात्मा फुले कृषी विकास पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवला. भाजपचे मोहिते पाटील गटाने स्थापन केलेल्या सोसायटीचे सयाजीराजे संस्थेला नावच फक्त राहिलेले आहे एक हाती सत्ता राष्ट्रवादी गटाच्या ताब्यात गेलेली असल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.

सयाजीराजे विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना २०१४ सालातील आहे. सभासद मतदार ३५४ होते. पैकी ३८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी सरपंच विष्णू गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पाटील, हनुमंत गोरे, विद्यमान सरपंच पोपट बोराटे, पुरस्कृत महात्मा फुले कृषी विकास पॅनेलने ११ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरवले होते. यांच्याविरोधात जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवामृत दूध उत्पादक संघाचे व्हाईट चेअरमन व सयाजीराजे विकास सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन सावता ढोपे यांच्या श्रीराम बाणलिंग विकास पॅनलने ११ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. या अटीतटीच्या लढतीत महात्मा फुले कृषी विकास पॅनलने सर्व जागेवर एकतर्फी विजय मिळवत यश संपादन केले.

या पंचवार्षिक निवडणुकीत महात्मा फुले कृषी विकास पॅनलचे दिलीप बोराटे, कांतीलाल देवकर, मधुकर ढोपे, हनुमंत गोरे, मारूती गोरे, सुनील गोरे, बाळासो पवार, श्यामराव शेंडे, मनीषा जाधव, राणी शेंडे, अरविंद शेंडे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. या अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणण्यासाठी बबन ढोपे, रामदास शेंडे, जयवंत शेंडे, बाबाजी पेडकर, माणिक गोरे, भारत पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोरे यांनी परिश्रम घेतले.

सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी वार.जी काकडे यांनी काम पाहिले. या कामात संस्थेचे सचिव सावता बोराटे व कर्मचारी यांनी मदत केली. निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे द्वारका केश व त्वचा विकार क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न…
Next articleआ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनी सतिशतात्या ढेकळेंनी केली पाण्याची सोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here