भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका यांची दूरसंचार विभागाच्या सल्लागार सदस्य पदी नियुक्ती.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आदेशाने व माढा लोकसभेचे कार्यतत्पर लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीने झाली नियुक्ती

माळशिरस ( बारामती झटका )

उंबरे दहिगाव ता. माळशिरस गावातील ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांची दूरसंचार सोलापूर विभागाच्या सल्लागार सदस्य पदी नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आदेशाने व माढा लोकसभेचे कार्यतत्पर लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीने दूरसंचार विभागाचे एस. के. घोष यांनी नियुक्तीचे पत्र दूरसंचार विभागाला दिलेले आहे.

सोपानकाका नारनवर भारतीय जनता पक्षात गेली वीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत असताना माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते लोकप्रतिनिधी झालेले आहेत. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात यशस्वी तालुका अध्यक्ष म्हणून सोपानकाका नारनवर ठरलेले आहेत. माढा लोकसभेचे कार्यतत्पर लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे सहकार्य सोपानकाका नारनवर यांना कायम लाभत आहे.

सोपानकाका नारनवर यांनी माळशिरस तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पद भूषविलेले आहे. त्यांनी उंबरे दहिगाव गावामध्ये स्वतः सरपंच होऊन अनेक लोकांना सरपंच केलेले आहे. उंबरे दहिगाव सेवा सोसायटीमध्येही सोपानकाका यांचा सिंहाचा वाटा आहे. धर्मपत्नी सौ. छायादेवी यांना माळशिरस पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. सोपानकाका यांचे राजकारण व समाजकारण सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन सुरू आहे. दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षामधील वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने भविष्यात निश्चितपणे उच्च पदापर्यंत मजल मारतील, असा विश्वास माळशिरस तालुक्यातील भाजपच्या निष्ठावान बुद्रुक गटामध्ये आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या दूरसंचार विभागाच्या सल्लागार सदस्यपदी ऐन दिवाळीत निवड झालेली असल्याने उंबरे दहिगाव गावात निवडीचा जल्लोष आणि दिवाळीचा जल्लोष असा दुग्ध शर्करा योग आलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articlePersonal Statement Author & Writing Service
Next articlePay to Have Essay Written For You

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here