भाजपमधून तालुका सरचिटणीस संदीप घाडगे व महिला तालुका अध्यक्षा कल्पना कुलकर्णी यांची पक्षातून हकालपट्टी.

मोहिते-पाटील गटाची भारतीय जनता पार्टी पक्षामधून उलट गिणतीला सुरुवात.


महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका महिला अध्यक्षा सौ कल्पना मिलिंद कुलकर्णी व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका सरचिटणीस संदीप सुरेश घाडगे यांच्या पत्नी सौ. जयश्री संदीप घाडगे यांनी निवडणूक लढवली ही पक्षविरोधी भूमिका घेतल्याने दोघांना भारतीय जनता पार्टीतून निलंबित करून हकालपट्टी केलेली आहे असे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांनी पत्राद्वारे केलेली आहे.
महाळुंग श्रीपुर नगरपंचायत 2021 मध्ये भारतीय जनता पक्षाने 13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती. प्रभाग क्रमांक 16 मध्ये निलिमा नरेंद्र खळदकर भाजपच्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांच्या विरोधात जयश्री संदीप घाडगे व कल्पना मिलिंद कुलकर्णी. यांनी निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात पक्षविरोधी भूमिकेमुळे पक्षाने तालुका सरचिटणीस संदीप घाडगे व महिला तालुका अध्यक्ष कल्पना कुलकर्णी यांची हकालपट्टी केलेली असल्याने मोहिते पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये उलट गिणतीला सुरुवात झाली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खुर्द व बुद्रुक असे दोन गट आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या निवडी दोन्ही गटांना समसमान दिलेल्या होत्या मोहिते पाटील यांच्या निवडी मध्ये सरचिटणीस संदीप घाडगे व महिला तालुका अध्यक्ष कल्पना कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस केलेली होती. मोहिते पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला हानिकारक असल्याने तडकाफडकी हाकलपट्टी केलेली आहे. मोहिते-पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात असताना अनेक वेळा पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या होत्या दोन्ही पक्षांनी समजून घेतलेले होते मात्र भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे मोहिते-पाटील यांना भविष्यातील राजकीय निर्णय घेत असताना अडचणीचे ठरणार आहेत. उमेदवारांची निवडणूक होऊन भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाल्यानंतर बारामती झटका वेबपोर्टल यांनी मोहिते-पाटील यांच्या महाळुंग श्रीपुर नगरपंचायती मधील दुटप्पी भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अडचणीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केलेले होते त्याचाच धागा पकडून भारतीय जनता पार्टी पक्षाने पक्षविरोधी कारवाई केलेली असल्याने बारामती झटका वृत्ताची दखल घेतली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ.चारूदत्त वसंतराव रणदिवे यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य हिप्नोथेरेपी अध्यक्ष पदी निवड
Next articleचि. सौ. का. वृषाली काळे आणि चिरंजीव निलेश गलंडे यांचा शाही शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here