माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देण्याच्या विचार असल्याचे फेसबुकवर डोक्यावर पाटी व हातामध्ये खराटा घेऊन नवीन पक्ष शोधण्याकडे वाटचाल असावी, अशी खळबळजनक राजकीय गोटामध्ये चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये कण्हेर ता. माळशिरस येथील सरगर परिवार गेली तीन पिढ्या भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. बाळासाहेब सरगर यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदावर काम केलेले आहे. सध्या भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे नुकत्याच पार पडलेल्या माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रभारी पदी त्यांची नियुक्ती केलेली होती. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये निवडणूक, आंदोलन, रास्ता रोको अशा अनेक कार्यक्रमांमधून बाळासाहेब सरगर नेहमी पुढच्या तोंडाला असतात. पक्षावर अथवा लोकप्रतिनिधीवर कोणी टीकाटिपणी केले तर बाळासाहेब सरगर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत असतात. बाळासाहेब सरगर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रबळ दावेदार समजले जातात. भारतीय जनता पक्षही त्यांचा विचार करेल, असे असताना बाळासाहेब सरगर यांनी फि. 1 एप्रिल या आपल्या वाढदिवसानिमित्त सकाळी डोक्यावर पाटी आणि हातामध्ये खराटा घेतलेले चित्र सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे बाळासाहेब सरगर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन अन्य पक्षाच्या शोधात असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. हातामध्ये खराटा असल्यामुळे कदाचित आप पक्षामध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्राची भाजपा किसान मोर्चाची बैठक बारामती येथे आज संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब यांची भूमिका स्पष्ट होईल, खरंच राजीनामा दिलेला नसेल का एप्रिल फूल हेही समजेल.

बाळासाहेब सरगर यांना वाढदिवसाच्या बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा !! बाळासाहेब आपणास उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील संपादक, बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल, मु.पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर, संपर्क 98 50 10 49 14 धन्यवाद.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
