मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी भाजपला ट्विट करत निशाना साधला आहे.
त्यांनी असं म्हटलं आहे, अहो सदाभाऊ, निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा. भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली, गरळ ओकली, आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं. भाऊ, हे लोक घासभर खाऊ घालतात आणि कोसभर चालत नेतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो “

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng