सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माळखांबी ता. माळशिरस येथील डॉ. नागनाथ दगडे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना या निवडीचे पत्र दिले आहे. भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपचिडे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, आयुर्वेद आघाडीच्या प्रमुख डॉ. उज्वला हाके, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीचे पत्र दिले आहे.

डॉ. नागनाथ दगडे यांनी सांगली येथे बी.एच.एम.एस. चे शिक्षण घेतले असून छत्रपती उदयनराजे भोसले प्रणित राजे प्रतिष्ठान कामगार सेनेेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असतात. वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची मोफत सेवा, गड किल्ले संवर्धनासाठी चालू असलेले काम, अनेक मोफत वैद्यकीय औषधोपचार शिबिरामध्ये सहभाग, कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण होते. वृक्षारोपण, गरजूंना मदत, अडीअडचणीमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी धावून जाणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत स्पष्ट वक्ते, प्रामाणिक असणारे डॉ. नागनाथ दगडे यांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, भाजपा प्रदेश सदस्य राजकुमार पाटील, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे मा.उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, सी.सी.एच. मा. सदस्य डॉ. किशोर मालोकार, भाजपा वैद्यकीय आघाडीचे होमिओपॅथि संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे, वैद्यकीय आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजक डॉ. सौ. संगिता पाटील, मिशन आयुर्वेदाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन गायकवाड, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सरचिटणीस वसंतराव गायकवाड, भाजपा युवा मोर्चाचे डॉ. अक्षय वाईकर, जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे सदस्य डॉ. शिवाजीराव काळे, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ. अनिल बळते, डॉ. नितीन कुबेर, डॉ. तुषार माने, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विजय निलटे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे हिंमत नागणे, बिभीषण पाटील, सुमित नागणे, सुदर्शन ताड, दलित महासंघाचे बच्चन साठे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
