काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले होते.
पंढरपूर ( बारामती झटका )
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वाचाळवीर नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. काल भंडारा जिल्ह्यातील एका प्रचारादरम्यान बोलताना “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी शिव्या देऊ शकतो व मारु शकतो” असे बेताल वक्तव्य करुन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमानच केला आहे. एक प्रकारे नाना पटोलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीवजा इशारा दिला आहे, काँग्रेसची ही प्रवृत्ती घातक आहे आणि याचा निषेध म्हणून आज देशभर विविध ठिकाणी निदर्शने, आंदोलने करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यात सुद्धा याचे पडसाद उमटले आहेत. पंढरपूर येथील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली. यावेळी नाना पटोलेच्या प्रतिमेला बांगड्या हार नेसवून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला असून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंढरपूर पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना भेटून नाना पटोले यांच्यावर फिर्याद दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी नाना पटोले यांना लवकर सावरण्याचा इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचे कोणतेही बेताल वक्तव्य सहन करणार नाही असेही भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले.

यावेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळनवर, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव खिलारे सर, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, राजाभाऊ जगदाळे, गणेश भोसले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. धनश्रीताई खटके पाटील, भटके विमुक्त मोर्चा महिला अध्यक्ष मायाताई माने, उद्योग आघाडीचे लिंगदेव कदम, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे, मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, पंढरपूर महिला शहराध्यक्ष डॉ. प्राजक्ता बेनारे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन यादव, युवा मोर्चा माढा तालुकाध्यक्ष उमेश पाटील, माढा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष श्रीशैल मोरे, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, सांगोला उपाध्यक्ष दिलीप सावंत, पंढरपूर युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहित पानकार, तालुकाध्यक्ष सुनील भोसले, अक्षय वाडकर, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ पाटील, सरचिटणीस लक्ष्मण वंजारी, नितीन कारंडे, निलेश नागणे, आण्णा धोत्रे, दीपक येळे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng