भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

अकलूज ( बारामती झटका )

विजय नागरी पतसंस्थेचे चेअरमन भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, काका जगदाळे, संतोष ऐवळे, राहुल उर्फ बंटी जगताप यांच्यावर अकलूज पोलीस स्टेशन येथे दि. 22/07/2022 रोजी रात्री तीन वाजता भारतीय दंड संहिता कलम 1960 अन्वये कलम 337, 323, 504, 506, 34 व सशस्त्र अधिनियम 1959 कलम 3 व 5 अन्वये सोमनाथ अंकुश हुलगे रा. माळीनगर यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

अकलूज पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये तक्रारदार सोमनाथ हुलगे यांनी म्हटले आहे की, विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे 2003 साली कर्ज घेऊन ऑटो रिक्षा घेतलेली होती. सदरच्या कर्जाच्या पैशावरून बँकेचे वसुली अधिकारी संतोष ऐवळे यांनी तडजोडीसाठी शिवशंकर बाजार येथील कार्यालयात बोलावून घेऊन दमदाटी, मारहाण, गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली, अशी तक्रार भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्यासह अन्य तिघांवर केलेली आहे. अकलूज पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.

पतसंस्थेच्या वसुलीसाठी झालेला प्रकार असल्याने पतसंस्था व बॅंकांनी वसुली कशी करायची आणि ठेवीदारांचे पैसे कसे द्यायचे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच वस्तुस्थिती समोर आणली जाईल.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांची माळशिरस विधानसभ मतदार संघातील सर्वच गावात विकासाची दमदार कामगिरी – भैय्यासाहेब चांगण.
Next articleकृषिकन्यांकड़ून शेती विषयक योजना व विविध मोबाईल ॲप्लिकेशनचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here