आई-वडिलांनी ज्या गावात पाऊल वाटेने कष्ट करून चांगल्या संस्कारातून घडवलेल्या मुलाच्या आमदार फंडातून त्याच रस्त्याचा शुभारंभ.
भांबुर्डी ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून भांबुर्डी तालुका माळशिरस येथे मेन कॅनल ते सर्जेराव वाघमोडे वस्ती खडीकरण करण्याचा शुभारंभ सोमवार दिनांक 17 जानेवारी 20 22 रोजी सकाळी रस्त्याचे कामाचा शुभारंभ भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ज्येष्ठ नेते माजी सरपंच गणपतराव वाघमोडे ,
भाजपा संघटन सरचिटणीस
संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, सरपंच महादेव वाघमोडे, माजी सरपंच केशव वाघमोडे, देविदास वाघमोडे ,ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघमोडे भोजा बंडगर, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू वाघमोडे ,सतिश दडस, आण्णा वाघमोडे ,सतिश वाघमोडे, सुखदेव नरळे, बापूराव वाघमोडे ,रणजित बोकफडे ,सूरज दडस आदी उपस्थित होते.

आ.राम सातपुते यांचे आई वडील, सौ जिजाबाई आणि श्री विठ्ठल सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी परिसरात ऊस तोड कामगार म्हणून या परिसरात काबाडकष्ट केलेले आहे. आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून आपल्या मुलाला चांगल्या संस्कारातून घडविलेले आहे त्यामुळेच ज्या गावात अनेक वेळा पाऊलवाटेने कष्ट करून येता जाता पायी चालत प्रवास केलेला आहे . आई-वडिलांनी ज्या गावात पाऊल वाटेने कष्ट करून प्रवास केलेला आहे त्यांनी चांगल्या संस्कारातून घडविलेल्या मुलाला याच मातीत आमदार होण्याचा बहुमान मिळाला मुलाच्या आमदार फंडातून त्याच रस्त्याचा आज शुभारंभ झालेला आहे अनेक भांबुर्डी करांना आमदार राम सातपुते यांच्या आई-वडिलांची आठवण आलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng