भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समन्वय समितीचे मुख्य अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन

भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामे व मागण्यांसाठी आग्रही…

अकलूज (बारामती झटका)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समन्वय समिती अकलूज यांच्यावतीने भारतरत्न डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवाचे औचित्य व अनुषंगाने अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांना विविध कामे करण्यासाठीचे निवेदन दिले आहे.

सदर निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकलूजमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील उद्यानात नेत्रसुखद, विविध रंगी व मनमोहक अशी बारमाही फुले देणारी झाडे व शोभेची झाडे लावण्यात यावीत, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचेही सुशोभीकरण करण्यात यावे, ११ एप्रिल पूर्वीच फुले दांपत्यांचे स्मारक व आंबेडकर स्मारकातील पुतळ्यांची रंगरंगोटी करून या दोन्ही स्मारक परिसरात मंडप, स्पीकर, विद्युत रोषणाई करून मॅट टाकणे, बौद्ध समाज वास्तव्य करीत असलेल्या वसाहती आंबेडकर नगर, पंचशील नगर, रमामाता चौक, होनमाने प्लॉट, व्यंकट नगर, विजयनगर कॉलनी, कर्मवीर चौक, समता नगर आदी भागातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करून सार्वजनिक शौचालय, मुतारी व नालेगटारी सर्व स्वच्छ करण्यात यावीत, रमामाता चौक व पंचशील नगर येथील बौद्ध समाज मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात यावी, तसेच परिसरातील बंद असलेली सार्वजनिक स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावी, जयंती कालावधीत सारनाथ बुद्ध विहार येथील सर्व परिसर स्वच्छ करून टॅंकरने पाणी मारावे, भीम जयंती मिरवणूक मार्गावरील आंबेडकर चौक, सदाभाऊ चौक, गांधी चौक, जुनी पोलीस चौकी ते आंबेडकर चौक यादरम्यान रस्त्याच्या कडेला असणारी जी झाडे आहेत त्याच्या वाढलेल्या, खाली झुकलेल्या फांद्या हटवण्यात याव्यात, तसेच या मार्गावरील विद्युत तारा व केबल्स उंचावर बांधण्यात याव्यात, तसेच या मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावे किंवा भरून काढावेत, दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल यादरम्यान रोज नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, जयंती काळात आंबेडकर चौकात स्टेज उभारण्यासह मान्यवर व्यक्ती व उपस्थित नागरिकांना बसण्यासाठी फायबर खुर्च्यांची तजवीज करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबागेवाडी येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
Next articleकेंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समवेत पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाची हवाई पाहणी केली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here