भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा तर जिल्ह्यात आठवा

करमाळा (बारामती झटका)

करमाळा येथील अमरनाथ महेश चिवटे इ. ४ थी याचा भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १४ वा तर जिल्ह्यात ८ वा क्रमांक आला आहे. अमरनाथला सारिका चेंडगे व सिद्धी रोकडे, आई अपर्णा चिवटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

अमरनाथ चिवटे हा गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून या संस्थेचे मुख्याध्यापक नितीन भोगे यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अमरनाथ चिवटे याच्यावर या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक तसेच करमाळा परिसरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरत्नत्रय शिक्षण संकुलनात भगवान वर्धमान महावीर जन्मकल्याणक उत्सव मोठया उत्साहात साजरा
Next articleमळोली येथे ह.भ.प. पांडुरंग माने महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here