भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याआधी बाळासाहेब लवटे पाटील यांनी विकास सेवा सोसायटीची विजयी सलामी भाजप नेत्यांना दिली.

मोहिते-पाटील परिवारातील ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, भाजपचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी नूतन संचालक व पॅनल प्रमुख यांचे आभार मानले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावतीने मेडद सोसायटीच्या निवडणुकीत दैदिप्यमान विजय संपादन केलेल्या नुतन संचालक मंडळाचा सन्मान

माळशिरस ( बारामती झटका )

मेडद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व तेरा उमेदवार दैदिप्यमान मतांनी निवडून आलेले होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे घवघवीत यश संपादन केलेल्या नूतन संचालकांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याआधीच माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांनी विकास सेवा सोसायटीची विजयी सलामी भाजप नेत्यांना दिली असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते. मेडदच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा तुपे जगताप गट व बाळासाहेब लवटे पाटील गट एकत्र येऊन निवडणूक लढविली होती.

श्री काळभैरवनाथ पॅनलचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, माजी सरपंच तुळशीराम तुपे ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, शंकरराव काळे, विजयराव तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, युवा उद्योजक दत्ताभाऊ झंजे, सदस्य अनिल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात सोपान महादेव हंगे, अमर लालासो जगताप, आनंता गोविंद काळे, विष्णू विठ्ठल पवार, भास्कर लक्ष्मण तुपे, विठ्ठल कुंडलिक यादव, अनिल भानुदास झंजे, सूर्यकांत निवृत्ती झंजे असे आठ उमेदवार आहे. महिला प्रतिनिधी गटात रेखा राजाराम तुपे, संगीता अनिल झंजे, अनुसूचित जाती जमाती गटात शिवाजी लक्ष्मण भिसे, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात सचिन सोपान लवटे, इतर मागास प्रवर्ग गटात आप्पा तुकाराम सोनटक्के अशा 13 उमेदवार यांनी दैदिप्यमान विजय मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केलेला होता. सोसायटीच्या निवडणूकीनंतर मेडद गावच्या राजकारणाने वेगळे वळण घेतलेली आहे.

गेल्या काही महिन्यापासून माळशिरसचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपचे प्रांतिक सदस्य के.के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाजपचे तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडीचे विद्यमान सरपंच लक्ष्मण उर्फ पिनू माने, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज वाघमोडे आदी भाजपचे पदाधिकारी बाळासाहेब लवटे पाटील यांच्या संपर्कात होते. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी बाळासाहेब लवटे पाटील यांच्या सांगण्यावरून अनेक विकास कामे केलेली आहेत. घनिष्ठ मैत्रीचे संबंध वाढलेले होते. पैलवान वैभवराजे लवटे पाटील यांच्या पुणे येथील हाताच्या ऑपरेशन वेळी आमदार राम सातपुते यांनी विशेष लक्ष दिलेले होते.

बाळासाहेब लवटे पाटील आणि भाजपचे पदाधिकारी यांच्या अनेक बैठका झालेल्या होत्या. बैठकीच्या वेळी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी सुद्धा फोनवर संपर्क झालेला होता. मेडद गावातील जगताप व तुपे गट यांनीसुद्धा मोहिते-पाटील यांना कल्पना दिलेली होती. सोसायटीमध्ये जगताप व तुपे गट आणि बाळासाहेब लवटे पाटील गट एकत्र येऊन सोसायटीची निवडणूक जिंकून बाळासाहेब लवटे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच नेत्यांना विजयी सलामी दिली आहे. सोसायटीमध्ये निवडून आलेले सर्व संचालक व दोन्ही गटाचे पॅनल प्रमुख शिवरत्न बंगला येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सन्मान करून भावी कारकिर्दीत शुभेच्छा दिलेल्या आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मेडद सोसायटीच्या नवनियुक्त संचालक व पॅनलचे प्रमुख यांचा सन्मान माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे केलेला होता. यावेळेस माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचे नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, ज्येष्ठ नेते शंकरराव काळे, माजी सरपंच तुळशीराम तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजीराव लवटे, विजयराव तुपे, निलेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य अनिल लवटे, सुखदेव जगताप, जयवंत तुपे, भगवान झंजे, दिनकर लवटे, हरी जगताप, रामचंद्र यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव काळे, नवनाथ जगताप, मधुकर काळे, गणपत जगताप, औदुंबर पवार, धनाजी लवटे, सुरेश तुपे, भीमराव वळकुंदे, शामराव जगताप, ज्ञानदेव पवार, सुनील सावंत, श्यामराव लवटे, सुरेश पवार, ज्ञानदेव काळे, संजय पवार, युवराज हांगे, माणिक सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रजाहितदक्ष राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन – अनिल भूसारी
Next articleतिरवंडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत स्वयंभू हनुमान शेतकरी विकास पॅनलची प्रचारात आघाडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here