भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात मुंबई महिलेने लावला हानीट्रॅप.

भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा केला दाखल.

मुंबई ( बारामती झटका सकाळ साभार )

मुंबईत एका महिलेने भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात हानीट्रॅप लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका महिलेवर मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत मुंबईत घर व दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेने त्यांच्याकडून यापूर्वी टप्प्याटप्प्याने १ लाख ७८ हजार फोन पे व २ लाख रुपये रोखीने स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एवढ्यावरच न थांबता त्या महिलेने राजकीय व सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकी ही दिली आहे. संबंधित महिला ही फिर्यादी देशमुख यांची नातेवाईक आहे. या महिलेविरोधात मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी-तरंगफळ रस्त्याची दुरुस्ती करा – संजय कोळेकर
Next articleसदाशिवनगर येथील रत्नत्रय संस्थेची अन्नदानाची परंपरा कायम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here