माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका कार्यालयामध्ये गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांची बिनविरोध निवड सरपंच पदी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी माळशिरस शहर कार्यालयांमध्ये सन्मान संपन्न झाला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुका अध्यक्ष सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस युवराज वाघमोडे, गोरडवाडीचे माजी चेअरमन संतोष गोरड, आदिनाथ गोरड, नवनाथ गोरड, बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरडवाडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवानेते विष्णू भाऊ गोरड यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याबद्दल भाजप कार्यालयांमध्ये सन्मान संपन्न झाला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनी विष्णू भाऊ हा तळमळीचा व तरुण कार्यकर्ता आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विष्णूभाऊ यांनी प्रयत्न करावे, विष्णूभाऊ यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng