माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी सुरज मस्के यांची निवड करण्यात आली आहे. शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, पक्ष चळवळ व पक्ष वृद्धीसाठी आपल्या कार्याचा व अनुभवाचा लाभ भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणी मंडळाच्या माध्यमातून, सामान्य माणसांच्या कल्याणासाठी होईल. तसे आपण आपले योगदान द्यावे व सक्रियपणे सहभागी होऊन सदैवत कार्यतत्पर राहाल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng