पुणे (बारामती झटका)
आज दि. 06/12/2021 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचा अथांग महासागर, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील उद्यानामधील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याकरिता भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष श्री. भिमराव साठे, सरचिटणीस महेश सकट, रविंद्र खैरे, अतुलजी साळवे, तसेच पदाधिकारी संदीप ओव्हाळ, अनिल पाटोळे, किशोर वाघमारे, शशिकांत जाधव, हिराजी बुवा, विकास सोनवणे, बापूसाहेब कांबळे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री. अनिलजी पाटोळे यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng