भारतीय दलित महासंघाची कार्यकारिणी बैठक संपन्न

अकलूज (बारामती झटका)

संस्थापक संजिवदादा खीलारे यांच्या मार्गदर्शनाखाली व म.प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह अकलुज याठीकाणी दि. 3.2.2022 रोजी संघटच्या कार्यकारनी आयोजित प्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राजाभाऊ सकट यांची निवड करण्यात आली. त्यानंतर माळशिरस तालुका अध्यक्षपदी गणेश खंडागळे, अकलुज शहर अध्यक्षपदी कैलास साठे, माळशिरस तालुका सचिवपदी दिगंबर साठे, माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे, माळशिरस कार्याअध्यक्षपदी महेश होनकंडे, माळशिरस तालुका सचिवपदी नवनाथ भोसले आदी निवडी यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सोलापूर जि.मार्गदर्शक दिलीपनाना सकट, लक्ष्मण पवार, संजिव लोखंडे, बळीराम भोसले, दिलिप थिटे, प्रदिप जाधव, अमोल भोसले या बैठकीस उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूजमध्ये राईज टू फिटनेस या अत्याधुनिक सुसज्ज अशा भव्य जिमचा शुभारंभ संपन्न.
Next articleअजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here