भारत-रशिया आंतरराष्ट्रीय परिषदेत माहिती तंत्रज्ञान व आरोग्य विषयक चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी डाॅ. नरेंद्र कवितके यांची निवड

नातेपुते (बारामती झटका)

दिल्ली येथे होत असलेल्या भारत रशिया आंतरराष्ट्रीय परिषदेत माहिती तंत्रज्ञान व आरोग्य विषयक चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्व गुलाल फाउंडेशनचे डाॅ. नरेंद्र कवितके यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सरकारी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

रशिया-भारत बिझनेस फोरम – स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, २९ व ३० मार्च २०२३ रोजी नवी दिल्ली येथे उपस्थित राहण्यासाठी नातेपुते येथील वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तिमत्व गुलाल फाउंडेशनचे डाॅ. नरेंद्र कवितके यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या फोरमचे ध्येय चर्चेला प्रोत्साहन देणे आहे. आयटी, सायबरसुरक्षा, उत्पादक आणि उत्पादन, स्मार्ट शहरे, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांमध्ये उच्च-तंत्रज्ञान युती बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. फोरमचा उद्देश व्यवसाय मजबूत करणे हा आहे. रशियन आणि भारतीय व्यावसायिक समुदायांमधील संबंध, रशियन उद्योजकांना मदत करणे, भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे आणि भारतीय भागीदारांना विशिष्ट निर्यात प्रस्तावांची माहिती देणे.

नातेपुते ता. माळशिरस, येथील सुप्रसिद्ध डॉ. नरेंद्र रघुनाथ कवितके यांचे नातेपुते येथे आदित्य नर्सिंग होम आहे. डॉ. नरेंद्र कवितके (एम.डी. फिजिशियन) आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. काजल कवितके (एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.) १४ वर्षांपासून अनेक रुग्णांवर अल्प खर्चामध्ये उपचार करत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. आदित्य नर्सिंग होम मध्ये हृदयरोग, डायबिटीस, प्रसूती अशा विविध सेवा उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमध्ये सेवाभावी वृत्ती व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, हा उदात्त हेतू ठेवून एनजीओ गुलाल फाउंडेशन मार्फत अनेक उपक्रम देखील राबविले जातात. त्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य विषयक सल्ले व मार्गदर्शन दिले जाते. त्याचबरोबर दहावी व बारावीनंतर एमबीबीएस, मेडिकल व इतर कोर्सेससाठी ऍडमिशन घेण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाते. वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातसुद्धा डॉ. नरेंद्र कवितके आणि डॉ. काजल कवितके यांचा नेहमी सहभाग असतो.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्रीराम नवमीनिमित्त हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान माळशिरसच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन #श्रीराम नवमी #हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान माळशिरस
Next articleखासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मतदार संघात ३ कोटी १० लाखाचा निधी मंजूर केला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here