भारुड सम्राट ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित

सदाशिवनगर ( बारामती झटका )

भारुड सम्राट ह.भ.प. ब्रह्मदेव आगतराव केंगार महाराज यांना अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी होलार समाज संघटनेचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका व होलार समाज यंग ब्रिगेड ग्रुप यांच्यावतीने होलार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र भेट देऊन गौरव करण्याचे पंचविसावे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. सदरचा कार्यक्रम अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदकुमार केंगार आणि होलार समाज यंग ब्रिगेडचे मार्गदर्शक दादासाहेब नामदास यांनी रविवार दि. 26 जून 2022 रोजी शिवामृत सांस्कृतिक भवन, सदाशिवनगर येथे आयोजित केलेला होता.
सदर कार्यक्रमाला समाजातील दहावी, बारावी, पदवीधर, सेट-नेट, डॉक्टर, इंजिनियर आदी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात भारुडसम्राट ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी असणारे सौ. बायडाबाई केंगार आणि श्री. आगतराव केंगार त्यांच्या कुटुंबामध्ये ब्रह्मदेव यांचा जन्म झालेला आहे. आई वडिलांच्या संस्कारावर ब्रह्मदेव यांनी आपल्या कलेत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. गेली 42 वर्ष अध्यात्मामध्ये भारुडाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम सुरू आहे. त्यांना भारुडसम्राट ही पदवी देण्यात आलेली आहे. ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ. चांगुणा, दोन मुले कृष्णा आणि अक्षय, दोन मुली काजल आणि संजीवनी यांची मोलाची साथ मिळत आहे. सध्या चारही मुलांचे विवाह होऊन उत्कृष्टरीत्या सर्वांचा संसार सुरू आहे.

ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज यांनी उत्कृष्ट कलेतून आपले समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. अशा सुपरिचित व सर्वगुणसंपन्न असणाऱ्या ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार महाराज यांना समाजाच्यावतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदहावी आणि बारावी आयुष्यातील टर्निंग पॉईंट – बाळासाहेब सरगर
Next articleश्री संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावरील माळशिरस हद्दीतील ६१ फाटा येथील जे. एम. म्हात्रे कंपनीचे कार्य कौतुकास्पद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here