भीमराव राजाराम वाघमोडे यांच्यावर आटपाडी पोलीस स्टेशन येथे 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल.

भीमराव वाघमोडे श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी माजी केन मॅनेजर व ओंकार शुगर चांदापुरी कारखान्यावर विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

भीमराव यांनी फायद्यासाठी माळशिरस मा. न्यायालय, शासनाची व माझी फसवणूक केली आहे – बाळासो वाघमोडे.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री. बाळासो राजाराम वाघमोडे राहणार मारकडवाडी तालुका माळशिरस यांनी पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस स्टेशन तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांनी दिलेल्या तक्रारीत सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याकडे ऊस वाहतूक करार कामी सन 2017 – 18 मध्ये दिलेली करार फाईल व त्यास जोडलेले स्टॅम्प पेपर मुद्रांक क्रमांक 324 क्रमांक 667180 ते 90 व चेक ची सर्व कागदपत्रे आरोपी नामे भीमराव राजाराम वाघमोडे यांनी दिनांक 24/08 / 2017 रोजी घेऊन जाऊन त्यापैकी स्टॅम्प पेपर मुद्रांक क्रमांक 324 हा तारीख 17 /05/ 20 17 कोऱ्या स्टॅम्प पेपर वर स्वतःच्या फायद्यासाठी खोटा व बनावट दस्त तयार करून सदरील खोट्या व बनावट स्टॅम्प पेपरचा रे.मु .नंबर 298/ 20 21 या दाव्यामध्ये बनावट दस्त चा पुराव्या कामी वापर करून खोटा व बनावट पुरावा तयार करून १)भीमराव राजाराम वाघमोडे २) आबा राजाराम वाघमोडे ३) बाईनाबाई शंकर वाघमोडे ४) सतीश शंकर वाघमोडे ५) श्रीकांत शंकर वाघमोडे ६) सर्जेराव आबा वाघमोडे ७) शंकर रामचंद्र बर्वे ८) हनुमंत गणपत मोरे यांचे विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई व्हावी असा तक्रारी अर्ज दिलेला होता तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने भीमराव राजाराम वाघमोडे यांच्यावर आटपाडी पोलीस स्टेशन येथे 18 /03/ 20 22 रोजी भारतीय दंड संहिता 1960 कलम 191 ,192, 196 ,199, 209 ,418, 420, 423 ,468, 447 कलमान्वये गुन्हा नोंद झालेला आहे.
बाळासो राजाराम वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादी जबाब मध्ये मला पत्नी एक मुलगा रणजीत आणि मुलगी स्नेहल आहेत. तीन भाऊ आबा, भीमराव शंकर तीन भावांपैकी शंकर हे मयत आहेत. आमची मारकडवाडी, नातेपुते, फोंडशिरस तसेच माळशिरस हद्दीमध्ये एकूण 64 एकर जमीन आहे काही बिगर सिटी प्लॉट आहेत त्या जमिनीचे व प्लॉटचे अद्याप वाटप झालेले नाही मी माझे भाऊ आबा व भिमराव यांना जमीन वाटून मागत होतो परंतु ते मला जमीन वाटून देत नव्हते त्यामुळे जमीन वाटून मिळण्याकरता दिवाणी न्यायालय माळशिरस येथे जमीन वाटपाचा दावा रे.मु .नंबर 298/2011 दिनांक 19 /05 /20 21 रोजी दावा दाखल केला होता सदर दाव्याचा निकाल अद्याप लागलेला नाही तो दावा सुरु आहे सदर दाव्याच्या तारखा मा दिवाणी कोर्ट माळशिरस येथे सुरू आहेत. माझे भाऊ आबा राजाराम वाघमोडे , भीमराव राजाराम वाघमोडे , बायनाबाई शंकर वाघमोडे, सतीश शंकर वाघमोडे, श्रीकांत शंकर वाघमोडे, यांनी आमचे वरील जमिनीचे वाटप झालेले असून एका शंभर रुपयाचे स्टॅम्प क्रमांक पी एस 667190 यावर जमीन वाटपाचा स्मरण दस्त दिनांक 17/0 5/ 20 17 रोजी केला असा स्टॅम्प तसेच त्यासोबत एक कोरा कागद व त्यावर सह्या व अंगठा केलेला अशी कागदपत्रे मा.दिवाणी न्यायालय माळशिरस 04/10/20 21 रोजी दाखल केला व त्यामुळे माननीय न्यायालयाने त्यास त्यांची एक नक्कल ही मला दिली त्यास त्यांचे मी अवलोकन केले असले नंतर माझे लक्षात आले की मी आणि माझा मुलगा रणजीत बाळासो वाघमोडे आम्ही मिळून श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी येथे सण 2017- 20 18 या साला करिता ऊस पुरविण्याकरिता वाहान करार केलेला होता त्यावेळी साखर कारखान्याने माझ्याकडून एकूण चार स्टॅम्प व मुलगा रणजीत यांचेकडून चार कोरे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर, चेक, आधार कार्ड, पॅन कार्ड वाहनाचे आरसी बुक झेरॉक्स प्रती घेतलेल्या होत्या ज्या वेळेस माझे दोन नंबर चे भाऊ भीमराव राजाराम वाघमोडे हे श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी येथे केन मॅनेजर या पदावर काम करीत होते . मी दिनांक 16/ 11/ 20 21 रोजी श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी येथे जाऊन सन 2017-18 साली केलेल्या वाहन कराराच्या फायली ची मागणी करता अर्ज केला व माझ्या करार फाईल व कोरे स्टॅम्प मागितले असता श्री श्री सद्गुरु साखर कारखाना यांनी यांचेकडील जावक क्रमांक शेती 48/ 2021 -22 दिनांक 16/ 11/ 20 21 अन्वये मला पत्र दिले की तुमचे वरील वाहन कराराची कागदपत्रे करार फाईल व फाईल मध्ये जोडलेले स्टॅम्प चेक अशी सर्व कागदपत्रे साखर कारखाना ऑफिस मधून श्री भीमराव राजाराम वाघमोडे यांनी दिनांक 24/08/ 20 17 रोजी घेऊन गेले असल्याबाबतचे पत्र त्यांनी सादर केलेले आहे सदर पत्रावरून मी वरील आमच्या करार फाईली ह्या कोणाच्या सहीने घेऊन गेले याबाबत विचारले असता साखर कारखाना येथील ऑफिस मध्ये मला सदर कागदपत्राचा पूर्वीच मागणी अर्जाची झेरॉक्स प्रत सादर केली ती पाहिली असता त्या मागणी अर्जावर माझे नाव मारून त्यांनी सही केली आहे त्या अर्जावर असले तारखा ह्या संभ्रम निर्माण करणाऱ्या असून त्यामध्ये खाडाखोड केलेली दिसत आहे यावरून माझे असे लक्षात आले की भाऊ भीमराव राजाराम वाघमोडे यांनी माझी फसवणूक केली आहे म्हणून आज रोजी त्यांचे विरुद्ध फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलो आहे तरी माझा भाऊ भीमराव राजाराम वाघमोडे राहणार मारकडवाडी तालुका माळशिरस याने श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी तालुका आटपाडी येथील आपले पदाचा गैरवापर करुन 24/0 8/ 20 17 रोजी श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी येथून मी साखर कारखाना यांना वाहन करार करण्याकरता सादर केलेले कोरे स्टॅम्प परस्पर काढून घेऊन त्यावर जमीन वाटपाचा स्मरण दस्त अशा खोट्या मजकुराचा तयार केला व त्या स्टॅम्प लगत असले कोऱ्या कागदावर वरील आठ लोकांच्या सह्या घेऊन खोट्या स्मरण दस्तऐवज तयार केला व आमचे भावाभावांचे वाटणी झालेली नसताना स्वतःचे फायद्याकरता वाटणीपत्र झाले असे दाखवून खोटा व बनावट पुरावा तयार करून दिवाणी न्यायालय माळशिरस येथे सादर करून शासनाचे तसेच मा. न्यायालयाची व माझी फसवणूक केलेली आहे म्हणून माझे भाऊ भीमराव राजाराम वाघमोडे यांचे विरुद्ध फिर्याद आहे अशी फिर्याद दिलेली होती.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा तालीम संघाला विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार नाही – शरदचंद्रजी पवार.
Next articleडाळींब दशा आणि दिशा – भाग – १ – सतीश कचरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here