माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका चिटणीस पिंपरी गावचे नेते हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी गट नंबर 308 मधील मोजणी हद्द फिक्स करण्यासाठी दि. 05/02/2022 पर्यंतची मुदत दिलेली आहे. अन्यथा माळशिरस येथील भुमिअभिलेख कार्यालयासमोर रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी गट नंबर 308 हा जगन्नाथ कोंडीबा कर्चे यांचा आहे. त्यांनी मोजणीसाठी अर्ज केलेला होता. त्या गटाची मोजणी पाच महिन्यापूर्वी झालेली आहे.
सदरच्या गटावर अद्यापपर्यंत हद्दी खुणा केलेल्या नाहीत, त्यामुळे सदर गटातील अडचणी आहेत. सदर गटातून रस्ता जाणार आहे, त्यामुळे हद्दी खुणा फिक्स नसल्यामुळे रस्त्याची कामे खोळंबलेली आहे. त्यामुळे हनुमंत कर्चे यांनी वारंवार ऑफिसला चौकशी केली पाठपुरावा केला तरीसुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. सदरच्या गटातील हद्दी खुणा करणे महत्त्वाची आहे कारण भुईवस्ती लगत पिंपरी कर्चेवाडी रस्ता आहे. भूईवस्ती ते हनुमंत कर्चे नाथा कर्चे कर्चे मेजर ते हरण टेक रस्ता मेन रोड शिंगणापूर येथे येणारा रस्ता रोजगार हमी योजनेतून चालू आहे. परंतु, सदरच्या गटाच्या हद्दी खुणा व्हाव्यात म्हणून जगन्नाथ कोंडीबा कर्चे सोमनाथ सदाशिव खर्चे यांनी गट नंबर 308 मधील हद्दी खुणा साठी अर्ज केलेला होता. भुमिअभिलेख कार्यालयाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम बंद आहे यासाठी तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाने कराव्यात अन्यथा भूमिअभिलेख कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी चिटणीस हनुमंत श्रीरंग कर्चे यांनी देऊन सदर अर्जाच्या प्रती तहसील कार्यालय माळशिरस पंचायत समिती माळशिरस यांना निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng