भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांची धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतय अशी अवस्था झाली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी पुणे पंढरपूर चौपदरीकरण पालखी महामार्गाच्या भूसंपादन जमीन मोबदला घोटाळ्याचे बारामती झटका वृत्ताचा झटका प्रशासनाला बसणार फटका.


माळशिरस ( बारामती झटका )

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी पुणे पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चौपदरीकरणासाठी वेळापूर तालुका माळशिरस येथील गटनंबर 1059 गटातील भूसंपादन मोबदला देत असताना डॉ. विजय देशमुख भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकलूज माळशिरस विभाग यांचेकडून 2 कोटी 85 लाख 21 हजर 811 रुपयाचे चंद्रकांत गणपत माने देशमुख व दत्तू गणपत माने देशमुख यांना बेकायदेशीर वाटप केलेल्याची तक्रार दिपक माने देशमुख यांनी केलेली होती. उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांची जाणीवपूर्वक डोळेझाक होत होती तक्रारदार यांची दखल घेतली जात नव्हती बारामती झटका वृत्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांत कार्यालय यांना सदर प्रकरणाची चौकशी चौकशी करून अहवाल सादर करावा अशा सूचना केलेल्या होत्या त्याप्रमाणे भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी चंद्रकांत माने व दत्तू माने यांच्या उताऱ्यावर फेरफार क्रमांक 13738 क्रमांकाने बोजा चढवून त्यांची बँकेत असणाऱ्या खात्याचा व्यवहार बंद केलेला होता.
चंद्रकांत गणपत माने व इतर यांनी मुंबई न्यायालयामध्ये 31/01/2022 महाराष्ट्र सरकार विरोधात दाखल केलेले आहे सदरचे दाखल केलेली 02/02/ 20 22 रोजी CNR No HCBM010044822022 नोंद झालेली आहे. रजिस्टर नंबर WP/1050/2022 Date 02/02/2022 नोंद झालेली आहे.
भू संपादित झालेले शेतकरी यांचे खात्यातील व्यवहार बंद व उताऱ्यावर बोजा चडवणे व इतर कारणासाठी न्यायालयात गेलेले असल्याने सध्या भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांची ” धरल तर चावतय सोडल तर पळतय “अशी अवस्था झालेली आहे. भू संपादित झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे निकटवर्ती यांच्याकडून ऐकावयास मिळत आहे आमच्या जमिनी कमी भू संपादित झाल्या ज्यादा झाल्या नाहीत तर पैसे कसे दिले असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सदर जमिनीच्या भूसंपादनाची हकीकत अशी तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांनी कार्यालया मार्फत क्र. भूसं. एस आर क्र/ 05/2018 दिनांक 27 /2/20 21 अन्वये जमीन गट नंबर 1059 मधील संपादित क्षेत्र 4925 चौरस मीटर इतके क्षेत्र संपादित होत असले बाबत काढण्यात आलेली होती तथापि दरम्यानच्या काळात होणारे खातेदार यांचे मध्ये कोणाची किती क्षेत्र संपदना मध्ये बाधित होत आहे याबाबत खात्री नसल्याने श्री व्ही जी वाळके सर्वेअर यांनी दिनांक 5/4/ 20 21 रोजी जागेवर जाऊन समक्ष मोजणी केली असता सदर गट नंबर 10 59 मध्ये 574 चौरस मीटरचे क्षेत्र संपादित होतं असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने ऑटोकॅड ला तपासणी केली असता सदर गटांमधील क्षेत्र 574 चौरस मिटर क्षेत्र संपादित होत असल्याचे स्पष्ट होत आहे तरी त्या अनुषंगाने आपणास क्र. भूसं. एस आर क्र/ 05/2018 दिनांक 27 /2/20 21 अन्वये देण्यात आलेली 4925 चौरस मीटरची नुकसान भरपाई रद्द करून आपणास गट नंबर 1059 मधील 574 चौरस मीटर संपादित क्षेत्राची दुरुस्त नोटीस देण्यात येत आहे अशी नोटीस 10/ 05 /20 21 रोजी देण्यात आली होती.


प्रांताधिकारी शमा पवार यांची बदली झाल्यानंतर डॉक्टर विजय देशमुख त्यांच्या जागी रुजू झालेले होते. भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी गट क्रमांक 1059 मधील संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला संगनमताने दिला असल्याची तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने या प्रकरणाला बारामती झटका यांनी सदरची बातमी प्रकाशित केलेली होती बारामती झटका वृत्ताचा झटका प्रशासनाला बसणार फटका अशी भू संपादित शेतकऱ्यांच्या मध्ये चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चौपदरीकरणासाठी 58 किलोमीटर महामार्ग भू संपादित झालेला आहे तर श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग चौपदरीकरणासाठी 24 किलोमीटर महामार्ग भू संपादित झालेला आहे सदरच्या भू संपादित क्षेत्रांमध्ये अनेक पीडित शेतकरी भू संपादित जमीन होऊन सुद्धा वंचित राहिलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या ज्यादा जमिनी जाऊन कमी मोबदला मिळालेला आहे. तर काही शेतकऱ्यांचे कमी क्षेत्र जाऊन ज्यादा मोबदला मिळालेला आहे. ज्यादा पैसे मिळालेले मस्त आहेत तर कमी पैसे मिळालेले त्रस्त आहेत. माळशिरस तालुक्यातील भूसंपादनात कोणाची काही अडचण असल्यास बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबरशी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सुरुवात गणेश जयंती दिवसाचा मुहूर्त.
Next articleसुप्रियाताई सुळे यांचा महाराष्ट्रातील युवतींनी आदर्श घ्यावा – बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here