पंढरपूर (बारामती झटका)
भोसे सोसायटीच्या निवडणुकीत पाटील गटाचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन सदस्यांचा सन्मान आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब माळी आणि काँग्रेसचे जिल्हा चिटणीस हनुमंत मोरे आदी उपस्थित होते.
रविवारी भोसे येथे जानुबाईदेवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पाटील विरोधी गटाने बाजी मारली. १३ पैकी १२ सदस्य निवडून आणले. यामुळे पाटील विरोधी गटाचे मनोबल चांगले उंचावले. मंगळवारी सकाळी सर्व सदस्यांचा सत्कार आ. प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून केला या संचालक मंडळाच्या पाठीशी आपण कायमचे उभे राहू, अशी ग्वाही परिचारक यांनी दिली.
याप्रसंगी भोसे येथील ज्येष्ठ नेते अनिल बोराडे, नारायण कोरके, अजय जाधव, प्रा. तुकाराम मस्के, संजय तळेकर. ॲड. नितीन खटके, प्रा. महादेव तळेकर, राजकुमार टरले, भारत कोरके, बाळासाहेब थिटे, मारुती कोरके, मोहन तळेकर, बळीराम थिटे, राजाराम मुळे, कांचन कोरके, नवनाथ घोडके, माऊली कोरके आदींसह इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
भोसे सोसायटीची निवडणूक प्रस्थापित पाटील कंपनीस धक्का देणारी ठरली. या निवडणुकीत पाटील विरोधी गटाने बाजी मारली. या विजयी उमेदवारांच्या पाठीवर थाप देण्याचे काम आ. प्रशांत परिचारक यांनी केले. पाटील विरोधी गटाचा या निवडणुकीतील विजय पुढील निवडणुकांवर निश्चितच परिणाम करणारा ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng