मंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गोमुत्राने आंघोळ घालून पवित्र करून जोडो मारो आंदोलन, अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळले.

माळशिरस ( बारामती झटका )

सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दि. 26/01/2022 रोजी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर गोमुत्राने आंघोळ घालून पवित्र करून प्रतिकात्मक पुतळ्यास आंदोलन करण्याचा इशारा ॲड. प्रशांत सुरेश रुपनवर पाटील अध्यक्ष राष्ट्रसेवा प्रतिष्ठान चेअरमन राष्ट्र सेवा शेतकरी गट नातेपुते तालुका माळशिरस यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलेले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी रुपनवर पाटील यांना रस्त्याच्या आपल्या तक्रारीबाबत दि. 28/01/2022 रोजी प्रत्यक्ष कामाच्या साईट भेटीदरम्यान आपल्या शंकेचे निरसन या विभागामार्फत उपविभागीय अभियंता करतील त्यामुळे संदर्भपत्रात उल्लेख केलेल्या कार्यवाहीची गरज भासणार नाही असे दि. 25/01/2022 रोजी पत्र दिलेले आहे. त्यामुळे मंत्र्याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास गोमुत्राने आंघोळ घालून पवित्र करून जोडो मारो आंदोलन अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे टळलेले आहे.

ॲड. प्रशांत सुरेश रुपनवर पाटील अध्यक्ष राष्ट्रसेवा प्रतिष्ठान चेअरमन राष्ट्र सेवा शेतकरी गट नातेपुते तालुका माळशिरस यांनी कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलेल्या सदर पत्रात आपल्या कार्यालयास दि. 01/07/2021 रोजी मौजे कळंबोली ते शिखर शिंगणापूर राज्य महामार्ग क्रमांक 124 या रस्त्याच्या मूळ आराखड्यात बदल करून अनेक ठिकाणी निकृष्ट काम केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती परंतु, याची आपण कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून दि. 09/08/2021 रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांचेकडे तक्रार देऊन दि. 15/8/2021 रोजी त्यांच्या कार्यालयासमोर कुपोषण करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्य अभियंता तसेच उपअभियंता अधीक्षक अभियंता व आपण उपोषण करू नये. आपल्या तक्रारीवरती कार्यवाही करतो, अशा स्वरूपाचे पत्र दिले. परंतु आजपर्यंत यावरती आपणाकडून कोणतीही कारवाई झाली नाही याचा निषेध म्हणून व आपल्या विभागाचे प्रमुख असणाऱ्या मंत्री महोदय यांना या गोष्टी जबाबदार धरून दि. 26/1/2022 रोजी प्रजासत्ताक दिनी आपल्या कार्यालयासमोर मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आपल्या कार्यालयासमोर गोमुत्राने आंघोळ घालून पवित्र करून जोडे मारो आंदोलन करून त्यांचा विभाग सामान्य लोकांना कशा प्रकारे वेठीस धरून ठेकेदार व धनदांडगे यांच्यासाठी कशाप्रकारे कार्य करीत आहे हे या संवेदनशील व सविनय आंदोलनातून जनतेसमोर आणणे हा एकमेव प्रामाणिक हेतू आहे, असे पत्र कार्यकारी अभियंता अकलूज यांना दि. 21/1/2022 रोजी दिले होते. त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी पत्र देऊन आंदोलनापासून परावृत्त केलेले आहे.

सदर च्या तक्रारीनुसार दि. 27/1/2022 रोजी उप अभियंता प्रत्यक्ष तक्रारीच्या रस्त्यावर भेट देऊन तक्रारदार यांच्या शंकेचे निरसन करणार असल्याने अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रसंग टळला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपं.स. सदस्या सौ. वाघमारे यांच्या फंडातून डायस, खुर्च्या, कचरापेट्यांचे वाटप.
Next articleसुसंस्कृत आचार, विचार आणि स्वकर्तृत्वाने समाजात वेगळे स्थान निर्माण करणारे आदर्श नेतृत्व.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here