मंथन परीक्षेत शिवराज ढोबळे प्रथम, तर यशराज नारनवर द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण

फोंडशिरस परीक्षा केंद्रावर उंबरे दहिगाव शाळेचे मंथन परीक्षेत घवघवीत यश

फोंडशिरस ( बारामती झटका )

फोंडशिरस येथील पाटील वस्ती परीक्षा केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेत उंबरे दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक चिरंजीव शिवराज धनाजी ढोबळे व द्वितीय क्रमांक चिरंजीव यशराज अमोल नारनवर यांनी पटकाविल्याने सर्व यशस्वी विद्यार्थी शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले जात आहे.

उंबरे दहिगाव शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करीत आहेत. शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचे चांगले योगदान आहे, असे मत यशराज नारनवर याचे आजोबा व भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनी व्यक्त केले. यावेळी यश संपादन केलेल्या दोन्हीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज प्रांताधिकारी पदी श्री. नामदेव टिळेकर यांची नियुक्ती…
Next articleनिरा-देवधरच्या पाण्यासाठी निवडणूकावर बहिष्कार, बचेरी गावाने खा. रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना दिले निवेदन …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here