मंदिर, मस्जिद व भोंग्याचे राजकारण काही लोकांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असून महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींना साथ देऊ नये, रविकांत वरपे यांचे जनतेला आवाहन …

मुंबई (बारामती झटका)

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते यांनी जनतेला आवाहन केले आहे. या आवाहनात असे म्हटले आहे कि, गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात काही पक्ष हे धार्मिक मुद्दे पुढे करून केंद्र सरकारच्या अपयशी कामामुळे वाढलेली महागाई, पेट्रोल-डिझेल, ढासळलेली देशाची अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी हे मूलभूत प्रश्न बाजूला करण्यासाठी धार्मिक मुद्दे पूढे करून महाराष्ट्राची शांतता व सुरक्षितता धोक्यात आणत आहेत. मंदिर आणि मस्जिद व भोंग्याचे राजकारण काही लोकांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असून महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींना साथ देऊ नये.

आपला पुरोगामी महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य असून महाराष्ट्र कधीही धार्मिक व धर्मांध लोकांना साथ देत नाही, हे जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. आपला लोकशाही भारत हा ७५ वर्षांपासून आनंदाने आणि एकोप्याने नांदत आहे. सर्वधर्म जपणे हा आपल्या देशाचा डीएनए आहे. सर्वांनी मिळून सर्वांची प्रगती साधुया. राज्यातील जनतेला माझे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आवाहन आहे की, कोणत्याही धार्मिक अफवांना बळी पडू नका.

सर्वांना आवाहन आहे की, आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. राज्यात हिंसेला पूरक वातावरण तयार होऊ देऊ नये. कोणाचाही द्वेष करून राज्याची शांतता संपवू नका. आपले महाराष्ट्र पोलिस सक्षम असून पोलिसांना सहकार्य करा. आपण सर्वजण मिळून आपले गाव, समाज, राज्य आपण सर्व मिळून शांत ठेवूया आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीपथावर घेऊन जाऊया.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जनतेला विशेषतः युवकांना विनंती आणि आवाहन करण्यात येत आहे. वाढलेली महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ यामुळे भाजपला व मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पुढे करून धार्मिक हिंसा, द्वेष, देशाचे पावित्र्य व बंधुभाव संपवण्याचे काम भाजप करत आहे.

धार्मिक मुद्दे पुढे करून मोदींचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलांचे भावी आयुष्य कोणत्या दिशेने घेऊन जायचे याचा विचार जनतेने करावा. भाजपा जो देश बनू पाहत आहे तो आपला मूळ भारत नाही. गुण्या-गोविंदाने नांदणारा, सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये एकोपा, प्रेम, बंधुभाव जपणारा आपला भारत आहे. या सुंदर भारताला भाजपा, राज ठाकरे हे नष्ट करू पाहत आहेत. राजकारण बाजूला ठेवून हा सुंदर देश वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे.

आपण सर्वांनी समाजात, सर्व जाती-धर्मांमध्ये एकोपा, प्रेम, बंधुभाव जपला जाईल तो वाढवला जाईल, याची काळजी घ्या. अफवांना बळी पडू नका, धार्मिक उन्मादाला थारा देऊ नका, एकमेकांचा द्वेष करू नका. हिंसाचाराला पूरक वातावरण तयार होईल अशी कोणतीही कृती कोणत्याही धर्माकडून होऊ नये, याची काळजी घ्या. आपणच आपल्या कुटुंबाचे, आपल्या मुलांचे, समाजाचे, राज्याचे, देशाचे भविष्य सुरक्षित ठेवूया.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी विकास सेवा सोसायटीची नाट्यमय घडामोडी नंतर बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.
Next articleअकलूज येथे द्वारका केश व त्वचा विकार क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here