महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस 6, नाना पाटील 5, नाना मुंडफणे 4, भाजप 1, काँग्रेस आय 1 विजयी उमेदवार.
नगराध्यक्षपदाची सोडत मंत्रालय मुंबई येथे प्रधानसचिवांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 27 जानेवारी 20 21 रोजी होणार.
महाळुंग ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुख राहुल रेडे पाटील सहा उमेदवार, भीमराव रेडे पाटील उर्फ नाना पाटील पाच उमेदवार, नानासाहेब मुंडफणे चार उमेदवार, भारतीय जनता पार्टी एक उमेदवार, काँग्रेस आय एक उमेदवार असे सतरा उमेदवारांचे पक्षीय बलाबल आहे. कोणत्याच गटाला अथवा पक्षाला बहुमत मिळालेले नाही. सर्वात जास्त जागा मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख राहुल रेडे पाटील उर्फ राहुल आप्पा यांनी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. विरोधात बसून जनतेची सेवा करू, असे राहुल रेडे पाटील यांनी बारामती झटक्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या तालुका जिल्हा व राज्यस्तरीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार उभे केले होते. सहा जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत. अनेक जागांवर निसटता पराभव झालेला आहे. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. विरोधी बाकावर बसून सुद्धा जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना राहुल आप्पा यांनी सांगितले की, राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केलेले असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पुढील काळामध्ये मतदारांचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अडीअडचणी सोडवून जनतेची कामे करणार आहोत. स्वर्गीय कुंडलिक भाऊ यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे. मतदारांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची आम्ही सर्व उमेदवार दक्षता घेऊन जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng