मदनसिंह मोहिते पाटील यांची मोरोची येथील स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.

मोरोची ( बारामती झटका )

मोरोची ता. माळशिरस येथील स्वर्गीय बकुळाबाई देवबा सुळ पाटील यांचे वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. स्व. बकुळाबाई यांच्या जाण्यामुळे सुळ पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे‌. सुळ पाटील परिवारांची सांत्वन पर भेट सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी भेट घेतली.

त्यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनुमंतराव सुळ पाटील, मोरोचीचे माजी सरपंच जालिंदर सुळ पाटील, प्रगतशील बागायतदार रमाकांत सुळ पाटील, सरपंच समाधान गोरे, छत्रपती पुरस्कार विजेते उमेश सुळ पाटील यांच्यासह सुळ पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleTotalAV Antivirus Review
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे माळशिरसचे अनिल भिवा ठेंगल यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here