मनसेच्यावतीने फडतरी गावचे बिनविरोध उपसरपंच प्रा. दुर्योधन पाटील यांचा सन्मान…

फडतरी ( बारामती झटका )

फडतरी ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्राध्यापक दुर्योधन विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे माळशिरस पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक ए. एम. सरवदे यांनी जाहीर केली. यावेळेस ग्रामसेवक बी.एम. होळ यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. या निवडीबद्दल नवनिर्वाचित नूतन उपसरपंच प्राध्यापक दुर्योधन पाटील यांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केला.

यावेळी सरपंच प्रियांका बापूराव निटवे, मावळते उपसरपंच आप्पा हनुमंत रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा बापूराव पाटील, विजय नाना रुपनवर, संगीता अर्जुन होळ, गौरी धनंजय रुपनवर, दुर्योधन विठ्ठल पाटील, सागर रोहिदास गुळीग, मनीषा महावीर रुपनवर, शशिकांत सिताराम निटवे, गिरजाबाई दगडू ठोंबरे आदी सदस्य व गावातील प्रतिष्ठित माजी सरपंच आजिनाथ रुपनवर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक रुपनवर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुन रुपनवर, माजी उपसरपंच धर्मराज ठोंबरे, बिरा ठोंबरे, युवक अध्यक्ष संजय रुपनवर, सेवा सोसायटी सचिव बापूराव पाटील, पांडुरंग रुपनवर, पोपट पाटील, भारत रणवरे, आरपीआय अध्यक्ष हनुमंत भोसले, गजानन चव्हाण, बाबू मुलाणी, ईश्वर सोरटे, कल्पना कंन्ट्रक्शनचे मालक इंजिनीयर युवराज नरळे आदी मान्यवरांसह गावातील नेते व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफडतरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रा. दुर्योधन पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.
Next articleजिजाऊ ब्रिगेड च्या वतीने तुकाराम जयंती साजरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here