मनसेच्या वर्धापन दिन व महिला दिनानिमित्त १५१ जणांचे रक्तदान..

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन व महिला दिनाचे औचित्य साधून मनसे माळशिरस तालुका यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी मोफत हेमोग्लोबिन तपासणी, महिलांचा सन्मान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५१ रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, नगरपंचायत कार्यालय अधीक्षक भाग्यश्री बेडगे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक स्मिता शिंदे, रमेश पाटील, डॉ. संजय सिद, सोमनाथ वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, नगरसेवक आबा धाईंजे, महादेव कोळेकर, प्रवीण केमकर, दादा शिंदे, कैलास वामन, रेश्मा टेळे, सूरेश टेळे, सचिन वावरे, जगन्नाथ गेजगे, रणजीत ओव्हाळ, विकास धाईंजे, बाळासाहेब सरगर, संतोष वाघमोडे, बाबा माने, अजित बोरकर, सोमनाथ पिसे, शीतल पाटील, आकाश सावंत, आकाश पाटील, संदीप पाटील, शिवाजीराव सिद, एम. डी. सिद, गंगाधर पिसे, विष्णुपंत गोरड, गोपाळ सिद, डॉ. आप्पासाहेब टेळे, अशोक देशमुख, काकासाहेब पाटील, आप्पासाहेब वाघमोडे, डॉ. गणेश वाघमोडे, डॉ. पंकज नलावडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. बीश्वास, डॉ. विकास काळे, डॉ. शामल कोळेकर पाटील, ॲड. दादासाहेब कोळेकर, रशीद शेख, आप्पासाहेब कर्चे, आकाश होनमाने, कुंडलिकराजे मगर, फिरोज शेख, रोहित खाडे, राजाभाऊ रासकर, लक्ष्मण नरोटे, मंगल ताई चव्हाण, प्रेम देवकाते, सागर शेगर, सुरेश वाघमोडे, अमित दोशी, योगेश देशमुख, दिनेश पोरे, अनंता जामदार, सुभाष नरोटे, नवनाथ गेजगे, विजय मदने, सनी गुरव, नदीम मुलाणी, नागेश शिंदे, पप्पू वाघमोडे, संतोष टेळे, भाऊसाहेब टेळे, नितीन टेळे, बाबा टेळे, आजिनाथ टेळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश टेळे यांनी केले तर सुत्रसंचालन आप्पासाहेब कर्चे यांनी केले आणि आभार रोहित खाडे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोमनाथ भोसले यांची आरपीआयच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड – बी. टी. शिवशरण
Next articleरत्नत्रय पतसंस्थेचा १८ वा वर्धापन दिन व महिला दिन उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here