मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील भ्याड हल्याचा माळशीरस तालुका मनसेच्यावतीने जाहीर निषेध

माळशिरस (बारामती झटका)

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सकाळी मॉर्निग वॉकला छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर येथे गेलेले असताना अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तेथील लोकांनी त्वरित हॉस्पीटलला नेले असल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध मनसे माढा लोकसभा मतदारसंघ मनसे माळशिरस तालुका व मनसे नातेपुते शहराच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध नातेपुते पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आला.

सदर निवेदन नातेपुते पोलीस स्टेशनचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी प्रवीण संपागे साहेब यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी सांगीतले कि, मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा आदर ठेवत शासनाला तातडीने संपुर्ण अहवाल पाठवणार आहे.

यावेळी निवेदन देताना मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे, मनसे नातेपुते मनसे शहर अध्यक्ष संतोष देवकाते पाटील, विद्यार्थी सेना अक्षय बावकर, नातेपुते शहर प्रसिद्धी प्रमुख दादा भांड, गिरवी शाखा अध्यक्ष सुभाष नरुटे, सचीन नरुटे आदी उपस्थीत होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथील प्रगतशील बागायतदार एकनाथ भिकू देशमुख अनंतात विलीन.
Next articleसोलापूर कृषि महोत्सव – २०२३ परिसंवाद, चर्चासत्र, कृषि प्रदर्शन, स्पर्धा, सन्मान बरेच काही !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here