मनसे शेतकरी सेना माळशिरस शहराध्यक्षपदी गणेश वाघमोडे यांची निवड.

माळशिरस ( बारामती झटका )

हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे व मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे यांनी आज माळशिरस येथील कृष्णकुंज या जनसंपर्क कार्यालयामध्ये माळशिरस शहर मनसे शेतकरी सेना अध्यक्षपदी गणेश वाघमोडे यांची निवड केली आहे.

यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश देशमुख, मनसेच्या पहिल्या नगरसेविका रेश्माताई टेळे, मनसे तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, मनसे व्यापारी सेना तालुका अध्यक्ष अमित दोशी, मनसे माळशिरस शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष गणेश वाघमोडे, सनी गुरव, नागेश शिंदे यांच्यासह अनेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे म्हणाले, येणाऱ्या काळात सर्वसामान्य खचलेल्या पिचलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मनसेकडे मांडावेत. 100% उत्तर फक्त मनसेच असणार आहे. यावेळी नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सन्मान महादेव मांढरे यांनी केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनंदुरबार जिल्हा परिषदेचा महाआवास अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
Next articleचि. सचिन गोरड व चि.सौ.कां. वैशाली वाघमोडे, चि. आप्पासो यमगर पाटील व चि.सौ.कां. प्रीती मारकड, चि. निलेश गोरड व चि.सौ.कां. आरती विरकर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here