पुणे (बारामती झटका)
माजी जलसंधारण मंत्री तथा परांडाचे आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी पुणे येथील निवासस्थानी जाऊन मराठा समाजभूषण आमदार तानाजी सावंत यांचा सत्कार केला.
मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्न सोडवण्यासाठी ४२ बांधव शहीद झाले होते. त्या बांधवांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत करणारे डॉ. आमदार तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी आमदार सावंत यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व मानाची पगडी घालून सत्कार केला. यावेळी सुनील नागणे, सचिन शिंदे, भगवान माकणे, बाळासाहेब पाथरकर, राजेंद्र जराड पाटील, सचिन पवार यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng