मराठ्यांचे खरे हक्काचे आरक्षण पन्नास टक्केच्या आत ओबीसी मध्येच – योगेश केदार

वेळापुर ( बारामती झटका )

मराठ्यांचे खरे हक्काचे आरक्षण 50% च्या आत ओबीसी मध्येच हळू हळू समाज आपल्या संविधानिक मागणीसाठी जागा होतोय. यापुढे समाजाने निःसंदिग्ध, सुस्पष्ट आणि निसंकोचपणे भूमिका घेतल्या पाहिजेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत मराठा समाजाचे समन्वयक योगेश केदार यांनी व्यक्त केले.

समाजाप्रती आणि विचारांच्या प्रती असलेल्या निष्ठा जपत दिवाळीनंतर लगेच बैठकांना सुरुवात झाली. काल पिसेवाडी, (वेळापूर) जि. सोलापूर, येथे मराठा समाजातील महत्त्वपूर्ण लोकांसोबत बैठक पार पडली. महाराष्ट्रात फुगीर आरक्षण कसे आहे ? जातीनिहाय जनगणना करणे का गरजेचे आहे ? ओबीसी आरक्षणबाबत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या नेमक्या अडचणी कोणत्या? त्यावर पर्यायी मांडणी कशी असू शकते? मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसीमध्ये आरक्षण कसे देता येईल? यावर लोकजागृती करणे हा एकमेव अजेंडा घेऊन काम करतोय. लोकांना पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सोप्प्या पद्धतीने समजावून सांगणे हे माझे प्रथम उद्दिष्ट आहे. येत्या काही दिवसांत आम्ही एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन बांधणी सुरू आहे. गेल्या दीड महिन्यांपासून माझ्या क्षमतेप्रमाणे मी महाराष्ट्रात फिरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत आरक्षणबाबत भूमिका पोचत आहेत. गावोगावी जागृती वाढत आहे. लोकांचा विश्वास आमच्यावर वाढल्याचा अनुभव जागोजागी येतोय. कालच्या बैठकीत पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, उद्योजक ॲड. श्रीकांतजी देशमुख, उद्योजक संजयजी देशमख, माजी सरपंच पिसेवडी श्री. धनंजय चव्हाण (भाकरे), संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक रणजित चव्हाण, सोमनाथ सावंत, सुरेश भाकरे, भालचंद्र वाळेकर, (ब्रंच मॅनेजर मारुती सुझुकी शोरुम) आशिष पोरे, उदय माळवदकर, सचिन पवार, सचिन भाकरे, निलेश भाकरे, स्वप्निल भाकरे, अमोल भाकरे, श्रेयस काळे, मराठा समाजातील जागृत बांधव उपस्थित होते.

योगेश केदार सदस्य, भारतीय अन्न महामंडळ, सल्लागार समिती महाराष्ट्र, भारत सरकार.
सदस्य, विभागीय रेल्वे वाहतूक सुविधा समिती, भारतीय रेल, भारत सरकार मो. 9823620666

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेजबाभु़ळगाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नाना उगले तर उपाध्यक्षपदी काकासाहेब फडतरे बिनविरोध
Next articleचांदापुरीच्या ओंकार साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा 350 रुपये ज्यादा दर जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here