मळोली (बारामती झटका)
काल दि.२५/०६/२०२२ रोजी माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जि. प. सदस्य बाळासाहेब उर्फ त्रिभुवन धाईंजे यांचा वाढदिवस मळोली या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मळोली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थींना खाऊ वाटप, अंगणवाडीत मुलांना गणवेश वाटप, महिलांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते मा. उत्तमराव जानकर साहेब, पं. स.सदस्य रणजितसिंह जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते विकासदादा धाईंजे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष रजनीश बनसोडे, RPIचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविराज बनसोडे, मळोली ग्रा. पं. माजी सरपंच गणेश पाटील, माळशिरस तालुका RPI युवक कार्याध्यक्ष मिलिंद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका संघटक रामा वाघमारे, चर्मकार संघटनेचे जिल्ह्याचे नेते रणजित लोखंडे, मळोली ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य, स्वप्नील बनसोडे, अनिल धाईंजे, परम सातपुते, अनिल माने, पत्रकार अस्लम शेख, सचिन वाघमारे, रोहित धाईंजे, रणजित कांबळे, धनाजी वाघमारे, सचिन जाधव, रोहन गायकवाड, प्रशांत खिल्लारे, महेंद्र गायकवाड, शाहू गायकवाड, नवनाथ जाधव, विकास वाघमारे, बाळा साठे, अण्णा खवळे, महेश केंगार, अमर साबळे, शुभम वाघमारे, विठ्ठल गायकवाड, सुरज वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व RPI चे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
