मळोली येथे ह.भ.प. पांडुरंग माने महाराज यांचे कीर्तन संपन्न होणार

कै. महादेव जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त फुलांचा कार्यक्रम कीर्तन, आरती व महाप्रसादाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस येथे कै. महादेव नामदेव जाधव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ह. भ. प. पांडुरंग माने महाराज गारअकोले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन गुरुवार दि. ०६/०४/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेमध्ये करण्यात आले आहे.

कीर्तनानंतर दु. १२ वा. फुलांचा कार्यक्रम व आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नातेवाईक व मित्र परिवाराने उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त मेजर मनोहर जाधव, मळोली ग्रामपंचायतीचे सदस्य बळीराम जाधव, शिवशंकर सोसायटीचे संचालक जयराम जाधव, सुनिता रामचंद्र निंबाळकर, नंदा पांडुरंग काळे पाटील आणि वंदना रमेश गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनाथ चिवटे राज्यात चौदावा तर जिल्ह्यात आठवा
Next articleमोरोची गावचे सरपंच समाधान गोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here