मळोली विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सत्यजित जाधव तर, व्हाईस चेअरमनपदी मनोजकुमार जाधव.

मळोली विकास सेवा सोसायटीची पन्नास वर्षापासून बिनविरोध चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडणुकीची परंपरा कायम.

मळोली ( बारामती झटका )

मळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मळोली, ता. माळशिरस या संस्थेच्या सन 2021 – 22 ते 2026 – 27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री. एम. एल. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेली होती.

माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी नेतृत्व लोकनेते स्वर्गीय जयसिंगराव नारायणराव जाधव यांनी 1952 साली सेवा सोसायटीची स्थापना केली होती. सुरुवातीपासून विकास सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडत होती. गेल्या तीन वर्षांपूर्वी लोकनेते जयसिंगराव जाधव यांचे दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात सोसायटीची पहिलीच निवडणूक होती. माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजीतसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीची चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाची बिनविरोध परंपरा कायम ठेवलेली आहे. मळोली विकास सेवा सोसायटीमध्ये तज्ञ संचालक मुकुंदराव भगवानराव जाधव व मनोजकुमार फत्तेसिंह जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन संचालक रणजीतसिंह जयसिंगराव जाधव, सत्यजित जयसिंगराव जाधव, मनोजकुमार भगवानराव जाधव, सुरेशराव जयवंतराव जाधव, शशिकांत विलास जाधव, मोहन मच्छिंद्र पवार, विलास निवृत्ती महाडिक, मोहन दिगंबर काळे, सौ. सुमन हरिदास जाधव, सौ. विद्या प्रभाकर इंगळे सरदेशमुख, दादासो जयवंत देवकते, शंकर महादेव ढेंबरे, अशोक भगवान वाघमारे आदी नूतन संचालकांची बैठक सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कोरे व श्री. जरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पडली.

चेअरमन पदासाठी सत्यजीत जयसिंगराव जाधव व व्हाईस चेअरमन पदासाठी मनोजकुमार भगवानराव जाधव यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर केल्या. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सोसायटीचे सचिव दीपक माळवदकर यांनी सहकार्य केले. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव नानासो पाटील, दत्तात्रय महाडिक, सुभाष जाधव, संजय गुजर, राजाभाऊ जाधव, सोमनाथ काटकर, विशाल कांबळे आदीं मंडळी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. सातपुते यांच्या शुभहस्ते धैर्यशीलभैया यांच्या उपस्थितीत.
Next articleTrumpet Net Cfo Allen Weisselberg Sentenced To retro looking cars Several weeks With Legal Regarding Duty Frauds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here