महर्षी प्रशालेच्या खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

यशवंतनगर (बारामती झटका)

दि. 23/01/2023 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे संपन्न झालेल्या पुणे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलींनी 4 x 100 मी. रिलेमध्ये कु. जानवी किसन खांडवे (इ. 7 वी, अ), कु. अवनी संजय नवगिरे (इ. 6 वी, अ), कु. गौरी अण्णासाहेब ननवरे (इ. 6 वी, अ), वैभवी उमेश ठोंबरे (इ.8 वी, अ), कु. सिद्धी उमेश ठोंबरे (इ. 7 वी, अ) या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकविला.

राज्यस्तर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, प्रशालेचे सभापती नितीन खराडे, सदस्य अनिल जाधव, कैलास चौधरी, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षेकेत्तर सेवक वर्ग यांनी या खेळाडूंना व त्यांना मार्गदर्शन केलेले अनिल जाधव, अनिल मोहिते, निखिल कोळी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून प्रगती करावी – खंडकरी शेतकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे.
Next articleसुप्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांच्या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here