परभणी (बारामती झटका)
परभणी तालुक्यातील महातपुरी येथील दलीत वस्तीमधील मागील पंधरा दिवसापूर्वी डीपी जळाला. तो आज बुधवारी बसवण्यात आला. यासाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पाठपुरावा केला होता. नवीन डिपी आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महातपुरी येथील दलित वस्ती भागात असलेला डीपी पंधरा दिवसापूर्वी जळाला. ग्रामस्थांनी आपापल्यापरीने महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्याकडे चकरा मारून डीपी देण्याची विनंती केली. अधिकारी मात्र डीपी वरील थकबाकीदारांना थकबाकी भरल्यावर डीपी बसवण्यात येईल अशी ग्रामस्थांना सांगत होते. अधिकाऱ्याकडे जाऊन कंटाळलेल्या ग्रामस्थांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधून डीपी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. यावरून सखाराम बोबडे, मुंजाभाऊ लांडे यांनी गंगाखेड येथील उपविभागीय अभियंता फड साहेब यांच्याशी चर्चा करून ग्रामस्थांच्या अडचणी समजून सांगितल्या. बुधवारी मात्र डीपी पाठवून देण्यात आला. अतिवृष्टीच्या काळात पंधरा दिवस अंधारात काढलेल्या या दलित वस्तीतील लोकांनी डीपी आल्याने आनंदोत्सव साजरा केला असल्याची माहिती भाजपा नेते शेख मुस्तफा यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng