माळीनगर (बारामती झटका)

माळीनगर येथील महात्मा फुले पतसंस्थेची सन 2020-21 या आर्थिक वर्षाची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा संस्थेचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे, व्हाईस चेअरमन महादेवराव एकतपुरे, संचालक किरण गिरमे, सुरज वाघमोडे, अंकुश फुले, कृष्णा भजनावळे, अमोल गिरमे, निळकंठ भोंगळे, जयवंत चवरे, प्रभाताई काळे, चंद्रकांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ आहे. संस्थेच्या एकूण ठेवी 15 कोटी 50 लाख आहेत. संस्थेचे भाग भांडवल 1कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी नऊ कोटीपर्यंत आहे. संस्थेला 1 कोटी 7 लाख रुपये नफा झालेला आहे. याहीवर्षी सभासदांना 15 टक्के लाभांश देणार आहे. कोविडच्या काळात संस्थेकडून आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे 11000 डब्यांची वाटप करण्यात आले. तसेच गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे 1000 किटचे वाटप केले. याहीपुढे संस्था सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहील व थोड्याच कालावधीमध्ये संस्था सीबीएस प्रणाली चालू करत आहे, त्यामध्ये सभासदांना एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग तसेच सर्व ऑनलाईन सुविधा पुरविणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng