महापरिवर्तन दिनाचे औचित्य साधून वाघोली गावात अंगणवाडी ना साहित्याचे वाटप.


वाघोली (बारामती झटका)

देशभरात महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवर्तन दिन साजरा होत आहे.वाघोली ग्रामपंचायत च्या वतीने महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महा परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.या महा परिवर्तन दिनाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत वाघोली यांच्या वतीने गावातील सर्व अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच सौ वृषाली योगेश माने होत्या.सर्वप्रथम गावच्या सरपंच वृषाली योगेश माने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमातच 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्वच अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले.अंगणवाडीतील सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडीना साहित्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य योगेश माने त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.सदर कार्यक्रमास माजी उपसरपंच कालिदास मिसाळ दिगंबर माने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ भारत पाटोळे राजेंद्र मिसाळ ग्रामपंचायतचे सदस्य योगेश माने अमोल मिसाळ तसेच ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका शिखरे मॅडम गणेश शेंडगे,मल्हारी जाधव,बलभीम ओहोळ,मारुती मिसाळ दादासाहेब गायकवाड उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleथेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारांनी चिरीमरी घेऊन सरपंच पदाची प्रतिष्ठा कमी करू नये.
Next articleमूकबधीर रोहीत अपंगत्वावर मात करुन कारागीरीतून बनला दुकान मालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here