टेंभुर्णी (बारामती झटका)
नुकतेच बेळगाव कर्नाटकात अखंड भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा खोडसाळपणा काही समाजकंटकांनी केला त्यानंतर सबंध देशभर संतापाची लाट उसळली या घटनेच्या अनुषंगाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.बोमय्या यांनी त्यावर कहर म्हणजे विटंबनेच्या घटनेच्या घटनेवर ही छोटी गोष्ट असे वक्तव्य करून सबंध शिवप्रेमींच्या भावनांवर आगीत तेल ओतायचे का केले.ज्या कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर ही छत्रपती शहाजीराजेंनी वसविले छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय स्वारी करुन कर्नाटकास स्वराज्यात सामील करुन संरक्षण दिले त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे बेताल वक्तव्य अतिशय निंदणीय आहे त्यांनी यावर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरकु देणार नाही असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी ईशारा दिला आहे.
टेंभुर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांच्या नावावर मतांचा जोगवा मागतात परवाच देशाचे राष्ट्रपती महामहीम रामनाथजी कोवींद हे रायगडावर येऊन शिवरायांच्या समाधीवर नतमस्तक झालेत अन् दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून असे बेताल वक्तव्य हे नेमके कशाचे द्योतक आहे.छत्रपती शिवराय व संबध बहुजन महापुरुष हे आमचे प्रेरणास्थान असुन असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत याअगोदरही संभाजी ब्रिगेडने सरसंघचालक के.सुदर्शन ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल व समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात फिरु दिले नव्हते हा इतिहास आहे तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जाहीर माफी मागावी अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे असा ईशारा सचिन जगताप यांनी ईशारा दिला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng